AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापुरात दोन वर्षांनंतर पुन्हा शाळेची घंटा वाजणार, जिल्हा परिषदेच्या 83 शाळा सुरु

कोरोनामुक्त असलेल्या 678 गावातील 83 जिल्हा परिषदेच्या शाळा पुन्हा सुरु होणार आहेत. यामुळे आजपासून या शाळेची घंटा वाजणार आहे.

सोलापुरात दोन वर्षांनंतर पुन्हा शाळेची घंटा वाजणार, जिल्हा परिषदेच्या 83 शाळा सुरु
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 9:09 AM
Share

सोलापूर : गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळेची घंटा अखेर आजपासून वाजणार आहे. सोलापुरात जिल्हापरिषदेच्या आजपासून भरणार आहेत. गेल्या दोन शैक्षणिक वर्षात बंद असलेल्या जिल्हा परिषदेच्या 83 शाळा आजपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (Solapur ZP 83 School Restart from today after two years Covid Pandemic)

आजपासून शाळेची घंटा वाजणार

सोलापुरात जिल्ह्यात 1 हजार 024 पैकी 678 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. यातील 335 गावात शाळा सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. यानुसार कोरोनामुक्त असलेल्या 678 गावातील 83 जिल्हा परिषदेच्या शाळा पुन्हा सुरु होणार आहेत. यामुळे आजपासून या शाळेची घंटा वाजणार आहे.

राज्यातील शाळा सुरु करण्याचा पहिला निर्णय सोलापुरात

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने कोरोनामुक्त असलेल्या गावात आठवी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्यातील शाळा सुरू करण्याचा पहिला निर्णय सोलापूरमध्ये घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सोलापुरात झालेल्या प्रशासनाच्या आढावा बैठकीत शाळा सुरु करण्याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घोषणा केली.

कोरोना नियमांचे पालन करत शाळा सुरु होणार 

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज 12 जुलै सोमवारपासून 8 वी ते 12 वीपर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  सोलापूर जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये कोरोना आटोक्यात आला आशा 335 गावांमध्ये शाळेची घंटा वाजणार आहे. शाळा सुरू करत असताना कोरोना नियमांचे पालन करण्यात येणार आहे. तसेच शिक्षण विभाग याबाबत योग्य ती खबरदारी घेईल, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहेत.

(Solapur ZP 83 School Restart from today after two years Covid Pandemic)

संबंधित बातम्या : 

पालघरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारात भेसळ, प्लास्टिकचा तांदुळ सापडल्यानं खळबळ

लहान मुलांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका जास्त, सध्याच शाळा सुरु करु नयेत : राजेश टोपे

नांदेडमध्ये लसीकरणाला वेग, आतापर्यंत 7 लाख ‘लसवंत’, 25 लाखांचं जिल्हाधिकाऱ्यांचं उदिष्ट

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली