‘पत्रास कारण की…’, ‘किशोर’चं अर्धशतक, विद्यार्थी शिक्षकांचं 50 फुट लांबीचं पत्र!

| Updated on: Oct 30, 2021 | 8:17 AM

पत्र म्हटलं की ते जास्तीत जास्त 80 ते 100 सेमी असते. परंतु वाशिमच्या एका शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांनी चक्क पन्नास फुटांचे पत्र बनवलंय. ही किमया साधली आहे, वाशिम जिल्ह्यातील कामरगाव इथल्या जि प.च्या शाळेतल्या मुलांनी..!

पत्रास कारण की..., किशोरचं अर्धशतक, विद्यार्थी शिक्षकांचं 50 फुट लांबीचं पत्र!
50 फुटांचं पत्र
Follow us on

वाशिम : पत्र म्हटलं की ते जास्तीत जास्त 80 ते 100 सेमी असते. परंतु वाशिमच्या एका शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांनी चक्क पन्नास फुटांचे पत्र बनवलंय. ही किमया साधली आहे, वाशिम जिल्ह्यातील कामरगाव इथल्या जि प.च्या शाळेतल्या मुलांनी… ‘किशोर’ मासिकाला पन्नास वर्षे पूर्ण झालीत. या आनंदाच्या क्षणी कामरगावच्या जिल्हा परिषद विद्यालय येथिल विद्यार्थी व शिक्षक यांनी आपल्या लाडक्या किशोरला चक्क 50 फुटांचे पत्र लिहिले. शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा देशमुख यांचे मार्गदर्शनात हा प्रकल्प गोपाल खाडे, नीता तोडकर,दिपाली खोडके,सतिष चव्हाण व शिक्षकवृंदानी व विद्यार्थ्यांनी राबविला.

यासाठी विद्यार्थ्यांनी 50 फुट अखंड पांढरा कागद वापरला. 1971 ते 2021 च्या नोव्हेंबर महिण्याचे मुखपृष्ठ पत्रांवर लावलेले आहेत. विद्यार्थी व शिक्षकांनी आपली मनोगत व्यक्त केली आहे. मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, त्यांना पुस्तकाबाहेरील ज्ञान मिळावं, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांच्या कोवळ्या मनावर उत्तम मूल्यसंस्कार व्हावेत या उद्देशानं गेली पन्नास वर्षे ‘बालभारती’च्या वतीने ‘किशोर’ हे मासिक प्रकाशित केलं जातं.

अनेक विद्यार्थी या पत्रलेखन उपक्रमात उत्स्फुर्तपणे सहभागी झाले.या भन्नाट कल्पनेचा विद्यार्थ्यांनी भरभरुन आनंद घेतला. मुलांना किशोर खूप आवडतो आणि त्यातल्या त्यात किशोरचा पन्नासावा वाढदिवस साजरा होत आहे म्हणून ही कल्पना भन्नाट कल्पना डोक्यात आल्याचे शाळेचे शिक्षक गोपाल खाडे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची ही किमया पाहून अनेकांच्या तोंडी सध्या या पत्राची चर्चा आहे.

हे ही वाचा :

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त, यशस्वी उपचारानंतर चाचणी निगेटीव्ह

Rajnikanth Health Updates: सुपरस्टार रजनीकांतवर शस्त्रक्रिया, काही दिवस मुक्काम रुग्णालयातच