AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajnikanth Health Updates: सुपरस्टार रजनीकांतवर शस्त्रक्रिया, काही दिवस मुक्काम रुग्णालयातच

“प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि त्यांची प्रकृती बरी होत आहे. त्याला काही दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, असे रुग्णालयाने सांगितले आहे.

Rajnikanth Health Updates: सुपरस्टार रजनीकांतवर शस्त्रक्रिया, काही दिवस मुक्काम रुग्णालयातच
| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 11:24 PM
Share

चेन्नईः सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर Carotid Artery revascularisation शस्त्रक्रिया पार पडली, जी मेंदूला रक्तपुरवठा पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया आहे. “प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि त्यांची प्रकृती बरी होत आहे. त्यांना काही दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, असे रुग्णालयाने सांगितले आहे. (Rajnikant went under brain surger in chennai kaveri hospital)

रजनीकांत यांना चक्कर आल्याने, काल 28 ऑक्टोबरला संधेयाकाळी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे ‘रुटिन चेकअप’ (health check up) साठी रुग्णालयात नेण्यात आलं अशी माहिती देण्यात आली होती.

रुग्णालया बाहेर पोलीस बंदोबस्त

अभिनेता रजनीकांत दाखल असलेल्या रुग्णालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. सुमारे 30 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत आशी माहिती मिळतेय. हा पोलीस बंदोबस्त रजनीकांतच्या चाहत्यांनी हॉस्पिटलमध्ये प्रवेश करण्यापासून किंवा गर्दी रोखण्यासाठी आहे. तैनात करण्यात आलेल्या पोलीसांमध्ये तामिळनाडूचे विशेष पोलिसांच्या दोन तुकड्यांचा समावेश असून प्रत्येकी तुकडीत 10 जण आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, परिस्थिती नियंत्रणात राहण्यासीठी हा पोलीस बंदोबस्त रुग्णालयाच्या समोर तैनात करण्यात आलाय.

मागील वर्षी 25 डिसेंबर रोजी प्रकृती बिघडली

तामिळनाडू राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते राजकारणात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती. मागील वर्षी 31 डिसेंबरला त्यांनी नवा पक्षाची घोषणा करेल असं सांगितलं होतं. मात्र त्याआधी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांनी कोणताही पक्ष स्थापन करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये असतांना, 25 डिसेंबर 2020 रोजी अचानक त्यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 27 डिसेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता.

Other news

Leander Paes: टेनिस स्टार लिएंडर पेसचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

Shah Rukh Khan House Mannat | आर्यनच्या स्वागतासाठी मन्नतवर रोषणाई, शाहरुख खानचा 200 कोटींचा बंगला आहे तरी कसा ?

पंतप्रधान मोदींची इटलीमध्ये EU च्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक संपन्न, G20 शिखर परिषदेत अनेक द्विपक्षीय चर्चा होण्याची अपेक्षा

;

Rajnikant went under brain surger in chennai kaveri hospital.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.