खंडणी मागणाऱ्यांना फोडून काढा, मोक्का लावून आत टाका, सुधीर मुनगंटीवारांची आक्रमक भूमिका

| Updated on: Aug 14, 2021 | 7:16 PM

20 वर्षपूर्वी राजकारणच गन्हेगारीकण हा विषय चर्चेला आला होता. पण, आता गुन्हेगारांचं राजकारण हा नवीन चर्चेचा विषय आहे. यासंदर्भात कायदे करण्याची गरज आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

खंडणी मागणाऱ्यांना फोडून काढा, मोक्का लावून आत टाका, सुधीर मुनगंटीवारांची आक्रमक भूमिका
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
Follow us on

वर्धा: 20 वर्षपूर्वी राजकारणच गन्हेगारीकण हा विषय चर्चेला आला होता. पण, आता गुन्हेगारांचं राजकारण हा नवीन चर्चेचा विषय आहे. यासंदर्भात कायदे करण्याची गरज आहे. खंडणी मागण्याची, आमच्या माणसाला काम द्या, युट्युबवर अनेक ऑडीओ क्लिप आहेत, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. पोलीस विभागाने सुमोटो कारवाई केली पाहिजे. राज्यात खंडणी मागणारे सुरक्षित आहेत पण त्रास होणाऱ्यांत मात्र असुरक्षिततेची भावना आहे, असं मुनगंटीवार म्हणाले. असुरक्षिततेची भावना असेल तर सर्वांनी याचा एकत्र येऊन विचार केला पाहिजे. मी कोणत्याही राजकीय पक्षावर आरोप करणार नाही पण खंडणी मागणारे या पक्षाचे त्या नेत्यांचे मागे जाऊन त्यांचे नारे लावत स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. खंडणी मागणाऱ्यांना फोडून काढण्यासाठी कायदा केला पाहिजे. त्यांना मोक्का लावून आत टाकावं, असं मुनंगटीवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पत्रावर म्हणाले. मिलिंद नार्वेकर स्वतःला वाघ म्हणतात. त्यांना धमकी त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा विचार करावा लागणार आहे. गुंडांची इतकी हिम्मत की ते वाघाच्या गुहेत जाऊन नार्वेकरांना व्हाट्सअप करताहेत. त्यामुळं वाटत की कायदा व सुव्यवस्थेची भीतीच राहिली नाही, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

संजय राठोड प्रकरण

शिवसेना आमदार माजी मंत्री संजय राठोड यांच्यावरील तक्रार खरी की खोटी आहे याची चौकशी व्हावी. वेगाने चौकशी व्हावी काय खरं काय खोटं ते पुढं आलं पाहिजे. काय खर काय खोटं याबाबत व्हाइट पेपर काढला पाहिजे. लोकांच्या मनात शंका ठेऊ नये. एसआयटी चौकशी होईल याबाबत पूर्वीच मत व्यक्त करणे योग्य नाही, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

मिलिंद नार्वेकर धमकी प्रकरण

शरद पवारांचा आवाज काढून बदली करण्यास सांगितलं, याचा अर्थ काय? अस सांगणाऱ्याला बेड्या ठोकल्या पाहिजे. कोणाचा ओरिजनल आवाज असला तरी बदली करायची नाही, असा जी आर सरकारने काढला पाहिजे. मिलिंद नार्वेकर स्वतःला वाघ म्हणतात. त्यांना धमकी त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा विचार करावा लागणार आहे. गुंडांची इतकी हिम्मत की ते वाघाच्या गुहेत जाऊन नार्वेकरांना व्हाट्सअप करताहेत. त्यामुळं वाटत की कायदा व सुव्यवस्थेची भीतीच राहिली नाही. नार्वेकरांना धमकी देणं हे तर मलाही आश्चर्य वाटत. नार्वेकरांना धमकी देणाऱ्याच चरित्र मलाही जाणून घ्यायचंय. थेट वाघाच्या गुहेत जाऊन धमकी दिली, हा कोण आहे बाबा?, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

बैलगाडा शर्यत

बैलगाडा शर्यतीबाबत उपलब्ध डेटा, कोर्टाचे निर्णय पाहून सरकारने निर्णय घ्यावा, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

इतर बातम्या:

चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न; तर बीडमधील वाढत्या गुंडगिरीवरुन पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात

क्रीडा विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन खासदार इम्तियाज जलील आक्रमक, स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले जाणार

Sudhir Mungantiwad demanded who demanded money impose mocca on them and also take jibe of shivsena