VIDEO: गाईनं घर पोसलं, धुळ्यात सर्पदंशाने मृत्यू झाल्यानं शेतकऱ्याकडून माणसाप्रमाणे वाजतगाजत अंत्ययात्रा

| Updated on: Aug 05, 2021 | 4:43 PM

प्राण्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा माणसाला इतका भुरळ घालतो की ही जनावरं नकळत कुटुंबाचा भाग बनून जातात. धुळ्यातील वाघाडी गावात असाच प्रकार पाहायला मिळालाय.

VIDEO: गाईनं घर पोसलं, धुळ्यात सर्पदंशाने मृत्यू झाल्यानं शेतकऱ्याकडून माणसाप्रमाणे वाजतगाजत अंत्ययात्रा
Follow us on

धुळे : जनावरं आणि माणसं यांचा संबंध अनेकदा अवाक करतो. प्राण्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा माणसाला इतका भुरळ घालतो की ही जनावरं नकळत कुटुंबाचा भाग बनून जातात. धुळ्यातील वाघाडी गावात असाच प्रकार पाहायला मिळालाय. वाघाडीच्या रामदास सूर्यवंशी या शेतकऱ्याकडे गाय होती. या गाईने अनेक वर्षांपासून त्यांचं पोसण्यात मोठा हातभार लावला. त्यामुळे गाईचं आणि सूर्यवंशी कुटुंबाचं खूप जवळचं नातं तयार झालं. मात्र, ही गाय गाभण असतानाच सर्पदंशाने तिचा मृत्यू झाला आणि सूर्यवंशी कुटुंबाला धक्का बसला. यानंतर सूर्यवंशी या शेतकरी कुटुंबाने या गाईला आपल्या घरातील सदस्याप्रमाणे निरोप दिला.

रामदास सूर्यवंशी यांच्या घरी कित्येक वर्षांपासून ही गाय होती. तिच्या दुधानं या कुटुंबाच्या उपजीविकेला मोठा आधार दिला. या गाईच्या दुधावर संपूर्ण कुटुंबीय अवलंबून असल्यानं या गाईसोबत कुटुंबाचं अनोखं नातं तयार झालं. त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर या शेतकऱ्याने घरातील सदस्याप्रमाणे या गाईची गावातून वाजत गाजत अंत्ययात्रा काढली. गाईची अंत्ययात्रा बघून गावातील नागरिक देखील भारावून गेले.

“गाईलाही घरातील सदस्याप्रमाणे निरोप दिल्यानं गावकरी भारावले”

आजपर्यंत गावकऱ्यांनी केवळ माणसांच्या अंत्ययात्रा पाहिल्या होत्या. मात्र या शेतकरी कुटुंबाने गाईलाही घरातील सदस्याप्रमाणे निरोप दिल्यानं गावकरीही भारावून गेले. सूर्यवंशी कुटुंबातील सर्वांच्या डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंच्या धारांनी या लाडक्या गायीला अखेरचा निरोप दिला.

“सूर्यवंशी कुटुंबीयांला गाईचा लळा, माणसाप्रमाणे अंत्ययात्रा”

लळा लावला की रानातलं पाखरू देखील माणसाळतं तसंच काहीसं या गायीच्या बाबतीत देखील झालं. सूर्यवंशी कुटुंबीयांनी गाईला लळा लावलेला होता आणि त्यामुळेच सूर्यवंशी कुटुंबीयांनी सर्पदंशाने मृत पावलेल्या आपल्या लाडक्या गायीचा अंत्यविधी घरातील सदस्याप्रमाणे केला.

हेही वाचा :

औरंगाबादमध्ये शेतात विजेची तार कोसळली, शेतकऱ्याच्या 7-8 गाईंचा हकनाक मृत्यू

गायीच्या पोटातील सुपर बॅक्टेरिया जे प्लास्टिकचा काळ ठरेल, जाणून घ्या याबद्दल माहिती

गाईनं दूध देणं बंद केलं तर तिचा उपयोग काय? लागा तयारीला, गाईवर पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर परीक्षा होणार, सरकारची घोषणा

व्हिडीओ पाहा :

Suryavanshi Family of Dhule arrange funeral of Cow like human being due to attachment