“भूमी वाचवणारी लोकं मेली तरी चालतील अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका”; बारसू आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांवर ठाकरे गटाची सडकून टीका

| Updated on: Apr 26, 2023 | 7:34 PM

हे सरकार देवदर्शनामध्ये व्यस्त आहे, राज्यातील माणसं मेली तरी त्यांना काही फरक पडत नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

भूमी वाचवणारी लोकं मेली तरी चालतील अशी  मुख्यमंत्र्यांची  भूमिका; बारसू आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांवर ठाकरे गटाची सडकून टीका
Follow us on

रत्नागिरी : राज्यातील राजकीय वातावरण आता बारसू आंदोलनामुळे चिघळले आहे. काल सरकारकडून आंदोलन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदा हल्लाबोल केला जात आहे. त्या प्रकरणावरूनच आता खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या जमिनींसाठी कोकणातील नागरिकांनी सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे. त्या आंदोलनाची दखल न घेता सरकारकडून हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

बारसू आंदोलनावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, उन्हात ज्या प्रकारे आंदोलन होत आहे. त्या आंदोलनाची सरकारकडून दखल न घेता ते चिरडून टाकण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

बारसू आंदोलनावरून त्यांनी सरकारला धारेवर धरण्याचाही प्रयत्न केला आहे. येथील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हे आंदोलन लोकशाही पद्धतीन केले आहे.

तरीही सरकारकडून मात्र आंदोलनातील नागरिक आणि महिलांना दहशतवाद्यांप्रमाणे वागणूक देत आहे अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली आहे.

या सरकारला शेतकऱ्यांचे काहीही पडले नसून ‘बारसू’आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांवर केसेस टाकण्याचं काम हे सरकार करत आहे असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केलाआहे.

या सरकारवर टीका करताना विनायक राऊत यांनी गंभीर आरोपही केले आहेत. या सरकारकडून राज्यात कोणत्याही प्रकारचे चांगले उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत.

तर आलेले उद्योग राज्याबाहेर घालवण्याचं कामही हे सरकार करत असल्याची टीकाही त्यांनी केली. विनायक राऊत यांच्याकडून सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, चांगले मलईदार उद्योग बाहेर पाठवायचे आणि प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात आणायचे हेच सरकारी धोरण सुरु असल्याचा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

रत्नागिरीत आलेले प्रकल्प सुरुवातीच्याच काळात सुविधा कशा प्रकारे देत असतात त्याचा पाडाही विनायक राऊत यांनी वाचला. कोकणात चालू असलेल्या उद्योगांच्या परिस्थितीवर विनायक राऊत यांच्याकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.

आरोग्य खात्याचा अहवाल विहिरी दूषित असल्याचे सांगण्यात आले आहे आणि हेच उद्योग कोकणात सुरु असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम हे शिंदे-फडणवीस सरकार करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

या प्रकारच्या कंपन्या जेव्हा कोकणात येतात त्यावेळी येथील नागरिकांना प्रलोबने दाखवण्याचं कामही त्यांच्याकडून केले जाते त्यामुळे लोकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

एकीकडे मुख्यमंत्र्यांचं देवदर्शन सुरू आहे मात्र भूमी वाचवणारी लोकं मेली तरी चालतील अशीच भूमिका मुख्यमंत्र्यांची असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

हे सरकार देवदर्शनामध्ये व्यस्त आहे, राज्यातील माणसं मेली तरी त्यांना काही फरक पडत नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.