नियतीने पाहिली परीक्षा; वडिलांचा मृतदेह घरात असताना ‘त्याने’ सोडविला दहावीचा पेपर

| Updated on: Mar 16, 2022 | 10:12 AM

नियती कुणाबरोबर कसा खेळ खेळेल हे सांगता येत नाही. मात्र, अशा परस्थितीवरही मात करता आली तर सर्वकाही जिंकल्यात जमा आहे. हेच धाडस लातूर जिल्ह्यातील चापोली येथील सूरज भालेराव याने दाखवले आहे. इयत्ता 10 वीमध्ये असलेल्या सूरजचा मंगळवारी पहिलाच पेपर होता. पहिल्या पेपरचे मानसिक दडपण असतानाच पेपर सुरु होण्यास काही तासाचा आवधी असताना सूरजच्या वडीलांचे निधन झाले. वडिलांचा मृतदेह दारात असताना परिक्षेला जावे तरी कसे?

नियतीने पाहिली परीक्षा; वडिलांचा मृतदेह घरात असताना त्याने सोडविला दहावीचा पेपर
वडिलांचा मृतदेह दारात ठेऊन परीक्षा देण्याची सूरजवर नामुष्की
Follow us on

लातूर : नियती कुणाबरोबर कसा खेळ खेळेल हे सांगता येत नाही. मात्र, अशा परस्थितीवरही मात करता आली तर सर्वकाही जिंकल्यात जमा आहे. हेच धाडस (Latur District) लातूर जिल्ह्यातील चापोली येथील सूरज भालेराव याने दाखवले आहे. (10th Exam) इयत्ता 10 वीमध्ये असलेल्या सूरजचा मंगळवारी पहिलाच पेपर होता. पहिल्या पेपरचे मानसिक दडपण असतानाच पेपर सुरु होण्यास काही तासाचा आवधी असताना सूरजच्या वडीलांचे निधन झाले. (Father Death) वडिलांचा मृतदेह दारात असताना परिक्षेला जावे तरी कसे? असा सवाल त्याच्या मनात घोळत होता. मात्र, एका पेपरच्या गैरहजरीने पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाणार यामुळे सूरजने मन घट्ट करुन वडिलांचा मृतदेह दारात असताना मराठी विषयाचा पेपर देण्याचा निर्णय घेतला. पेपर सुटल्यानंतर मग त्याने वडिलांवर अंत्यसंस्कार केले.

परीक्षेच्या दोन तास अगोदरच घडली दुर्घटना

सूरजचे वडिल तात्याराव किशन भालेराव हे विटभट्टीवर मजूर होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होती. मंगळवारी पहाटेच त्यांचे निधन झाले. याच दिवशी त्यांचा मुलगा सूरज याचा इयत्ता 10 वी चा पहिला पेपर होता. मात्र, पेपरला जाण्यापूर्वीच सूरजला या नियतीच्या परीक्षेला सामोरे जावे लागले. वडिलांचा मृतदेह दारात असताना त्याने परीक्षेला महत्व दिले. मात्र, पेपर सोडवत असतानाही सूरजच्या मनावर काय बेतले असेल याची कल्पनाही करता येणार नाही. पण त्याने मन घट्ट करुन मराठी विषयाचा पेपर दिला आणि दुपारनंतर वडिलांवर अंत्यसंस्कार केले.

मजूरीवरच होतो उदरनिर्वाह

सूरज भालेराव याच्या कुटुंबातील सर्वजण हे मजुरीचे काम करतात. हाताला काम तर पोटाला भाकर अशी काही घराची परस्थिती. वडिल तात्याराव किशन भालेराव हे देखील विटभट्टीवर मजुरी करीत होते. पण गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ऐन सूरज्या पहिल्याच पेपर दिवशी त्यांचे निधन झाले. त्यामुळे सूरजची द्विधा मनस्थिती झाली होती पण त्याने आगोदर शिक्षणाला महत्व दिले. मराठीचा पेपर देऊनच त्याने अंत्यसंस्काराला हजेरी लावली.

परीक्षा केंद्र चापोलीतच

इयत्ता 10 वी शिक्षण घेत असलेला सूरज हा चापोलीचाच. शिवाय त्याचे परीक्षा केंद्रही चापोलीतच होते. त्यामुळे पेपर देऊन त्याने घर जवळ केले. यानंतर कुटुंबियांनी व गावातील नागरिकांनी तात्याराव भालेराव यांच्या अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. नियतीच्या परीक्षेत तर सूरजने धाडस दाखवले मात्र, ज्या अवस्थेत त्याने मराठी विषयाचा पेपर दिला त्याचा निकाल काय हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

राज्यभरातील किसानपुत्र आक्रमक; 19 मार्चला आंदोलनाचे रणशिंग, नेमकी मागणी काय?

चंद्रपुरात रामदेवबाबा सालव्हंट कंपनीमुळे प्रदूषण? MPCB च्या मानकानुसार यंत्रणा बसवल्याची कंपनीची स्पष्टोक्ती

Video | गाय मरणाला टेकली होती, शेतकरी तिला खांद्यावर उचलून घेऊन आला, आता वासराचं धुमधडाक्यात बारसं!