AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच, भरधाव क्रूझर आयशरला धडकली अन्…

लहान मुलाच्या लग्नासाठी सर्व कुटुंब विरारहून जालन्यात गेले होते. लग्न समारंभ आटोपून नवविवाहितेला घेऊन सर्वजण मुंबईला परतत होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच, भरधाव क्रूझर आयशरला धडकली अन्...
समुद्धी महामार्गावर अपघातात माता-पित्यांसह चिमुकलीचा मृत्यूImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 30, 2023 | 1:27 PM
Share

कोपरगाव : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात समृद्धी महामार्गावर आयशर वाहनाला मागून क्रुझर वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्दैवी घटनेत पती-पत्नीसह दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. संतोष अशोक राठोड आणि वर्षा संतोष राठोड अशी मयत जोडप्यांची नावे आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत संतोष राठोड यांचा पाच वर्षाचा मुलगा, आई आणि नवविवाहित जोडप्यासह पाच ते सहा जण जखमी असून, त्यांच्यावर आत्मा मालिक रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मयतांचे शव शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.

भावाच्या लग्नासाठी सर्व कुटुंबीय गावी आले होते

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष राठोड हे मूळचे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील गोसावी पांगरी येथील रहिवासी आहेत. मात्र कामानिमित्त ते कुटुंबासह मुंबईलगत असलेल्या विरारमध्ये राहत होते. लहान भावाच्या लग्नासाठी संतोष राठोड परिवारासह जालना येथे मूळगावी आले होते. 26 जून रोजी लग्न झाल्यानंतर ते 29 जून रोजी आपल्या परिवारासह क्रुझर वाहनाने रात्री समृध्दी महामार्गावरून मुंबईकडे निघाले होते.

अपघातात नवविवाहित जोडपेही जखमी

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात पोहोचल्यानंतर तेथून जाणाऱ्या आयशर टेम्पोला क्रुझर जीपने मागून जोराची धडक दिली. या अपघातात दीड वर्षाच्या मुलीसह तिघांचा मृत्यू झाला तर क्रुझर चालकासह 5 ते 6 जण जखमी झाले. जखमींमध्ये संतोष यांचा भाऊ कृष्णा राठोड, त्याची पत्नी कोमल राठोड आणि आई बताबाई अशोक राठोड यांचा समावेश आहे. जखमींवर आत्मा मालिक हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. दरम्यान आयशर चालकाने क्रुझर जीप चालकाविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.