
रत्नागिरी: जरंडेश्वर कारखाना हे हिमनगाचं टोक आहे. त्यामुळे सर्वच 54 साखर कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी मी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रं लिहून तशी मागणी करणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील यांचं ते वैयक्तिक पत्र आहे. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा हा डाव आहे. त्यातलाच हा एक भाग असल्याचं मत उदय सामंत यांनी नोंदवलंय. (Uday Samant Said Chandrakant Patil letter to Amit Shah regarding 54 sugar mill is plan of break Cooperative Sector)
उदय सामंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पत्राविषयी बोलताना हा सहकार मोडण्याचा डाव आहे. सहकार मोडण्याच्या प्रयत्नातील तो एक भाग असल्याचं त्यांनी म्हटलं.
अनिल देशमुख हे दिल्ली का गेले याची मला माहिती नाही. पण, ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी अनिल देशमुख सक्षम आहेत. या कारवाई मागची भावना जनतेला माहिती आहे. जनतेपर्यत ती पोहचली आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिलीय.
चंद्रकांत पाटील यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना ही माहिती दिली. 54 साखर कारखान्यांची कवडीमोल भावात विक्री झाली आहे. त्यामुळे या कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे. जरंडेश्वर तर हिमनगाचं एक टोक आहे. या 54-55 कारखान्यांची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि इतरांनी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सर्वांची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी अमित शहा यांच्याकडे पत्रं लिहून मागणी करण्यात येणार आहे, असं पाटील यांनी सांगितलं.
हेही वाचा- VIDEO: 54 साखर कारखान्यांची चौकशी करा; चंद्रकांतदादा अमित शहांना पत्रं लिहिणार
अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाडगे यांच्या ताब्यात असणाऱ्या जरंडेश्वर शुगर मिलला ईडीनं सील केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यानंतर अजित पवार यांनी ती कारवाई गुरु कमोडिटीज शी संबंधित असल्याचं देखील सांगितलं होतं. तर, उच्च न्यायालयाच्या आदेशान जंरडेश्वर साखर कारखान्याचा लिलाव झाला होता, अशी माहिती त्यांनी दिली होती.
संबंधित बातम्या:
ईडी, सीबीआयचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी, राजू शेट्टींचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात, छगन भुजबळ यांचं वक्तव्य
काय आहे जरंडेश्वर कारखाना प्रकरण, अजित पवारांचा नेमका संबंध काय?
(Uday Samant Said Chandrakant Patil letter to Amit Shah regarding 54 sugar mill is plan of break Cooperative Sector)