समुद्रात पिकनिक साजरे करायला गेलेल्या चारपैकी दोघांचे मृतदेह सापडले; नेमकं काय घडलं?

रविवार सुट्टीची पिकनिक मनवण्यासाठी नालासोपारा वरून 4 जणांचा गृप कळंब समुद्र किनाऱ्यावर गेला होता. नालासोपारा पूर्व बिलालापाडा श्रीरामनगर येथील राहणारे आहेत.

समुद्रात पिकनिक साजरे करायला गेलेल्या चारपैकी दोघांचे मृतदेह सापडले; नेमकं काय घडलं?
| Edited By: | Updated on: Mar 13, 2023 | 12:20 PM

वसई : वसईच्या समुद्रात बुडालेल्या एकाचा मृतदेह आज सकाळी भुईगाव समुद्र किनाऱ्यावर सापडला आहे. काल कळंब समुद्र किनाऱ्यावर दोन तरुण समुद्रात पोहत असताना बुडाले होते. रात्रीच एकाचा मृतदेह सापडला होता तर आज सकाळी एकाचा मृतदेह सापडला आहे. रोशन गावडे आणि सौरभ पाल असे मृतदेह सापडलेल्या तरुणांची नाव आहेत. नालासोपारा पूर्व बिलालापाडा श्रीरामनगर येथील राहणारे आहेत. रविवार सुट्टीची पिकनिक मनवण्यासाठी नालासोपारा वरून 4 जणांचा गृप कळंब समुद्र किनाऱ्यावर गेला होता.

दोन जण वाहून गेले

समुद्रात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण बुडाले होते तर दोन जण सुखरूप बाहेर आले होते. किनाऱ्यावरील जीवरक्षक जनार्दन मेहेर, चरुदत्त मेहेर यांना आज सकाळीच समुद्र किनाऱ्यावर एक मृतदेह मिळाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन अहवालासाठी पाठविला आहे.

चार मित्र मज्जा करायला समुद्रात उतरले

चार मित्र मज्जा करायला समुद्रात गेले होते. वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर दोन जण बुडाले. दोन जण सुखरूप बाहेर आले. त्यांनी आरडाओरडा करून लोकांना सांगितलं. दोघेही लाटेबरोबर समुद्रात वाहून गेले. तरुण बुडाल्याची माहिती वसई-विरार मनपाच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. तरुणांचा शोध घेण्यात आला.

दोघांचेही मृतदेह सापडले

एकाचा मृतदेह काल सापडला. तर दुसऱ्याचा मृतदेह आज सकाळी सापडला. रविवार असल्याने चार मित्र फिरण्यासाठी गेले होते. समुद्रात मौजमस्ती करत असताना दोन जण बुडाले. समुद्रकिनाऱ्यावरील लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, समुद्राच्या लाटेबरोबर ते वाहून गेले होते.  रात्री एकाचा मृतदेह सापडला होता. दुसऱ्याचा मृतदेह आज सकाळी सापडला. हे तरुण मौजमस्ती करण्यासाठी गेले होते. पण, चारपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.