Urmila Matondkar सोबत प्रेमसंबंध… प्रसिद्ध दिग्दर्शकाने अनेक वर्षांनंतर सोडलं मौन… म्हणाला, ती माझ्या आयुष्यातील अशी एक…
Urmila Matondkar Love Life : प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत उर्मिलाचे प्रेमसंबंध... त्याच्या बायकोने लगावलेली कानशिलात... अनेक वर्षांनंतर दिग्दर्शकानं सोडलं मौन आणि म्हणाला, ती माझ्या आयुष्यातील अशी एक..., सध्या सर्वत्र दिग्दर्शकाची चर्चा...

Urmila Matondkar Love Life : बॉलिवूड स्टार त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात… बॉलिवूडमध्ये अशी अनेक प्रेमप्रकरणं झाली ज्याची चर्चा आजही बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये रंगलेली असते. शिवाय चाहते आजही सेलिब्रिटींना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल विचारत असतात. असंच काही अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत देखील झालं आहे. एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त उर्मिला आणि वर्मा यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. पण आता अनेक वर्षांनंतर राम गोपाल वर्मा यांनी अफेअरबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
बॉलिवूडमध्ये राम गोपाल वर्मा आणि उर्मिला यांच्या नात्याची चर्चा सुरु होती तेव्हा, दिग्दर्शकाच्या पत्नीपर्यंत सत्य पोहोचलं आणि त्यांच्या पत्नीने उर्मिलाच्या कानशिलात लगावली.. असं देखील सांगितलं जातं… आता अनेक वर्षांनंतर यावर वर्मा यांनी स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे. वरर्मा म्हणाले, ती एक बहुमुखी प्रतिभा असलेली अभिनेत्री आहे.
राम गोपाल वर्मा म्हणाले, ‘उर्मिला उत्तम अभिनेत्री आहे. म्हणून तिच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं… मी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण त्याबद्दल कधीच कोणती चर्चा होत नाही.. या प्रकारे सिस्टम आणि सोशल मीडिया काम करतं…’ असं देखील राम गोपाल वर्मा म्हणाले.
बायकोला दिला घटस्फोट
राम गोपाल आणि उर्मिला यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा त्यांच्या बायकोपर्यंत पोहोचल्या. थेट परिणाम त्याच्या वैवाहिक जीवनावर झाला. त्यानंतर वर्मा आणि पत्नी विभक्त झालं… असं देखील सांगितलं जातं… पण राम गोपाल वर्मा घटस्फोटाचं कारण वेगळं सांगतात.
सांगायचं झालं तर, वर्मा यांनी बॉयोग्राफी Guns And Thighs: The Story Of My Life मध्ये उर्मिलाबद्दल खास गोष्ट लिहिली आहे. उर्मिला माझ्या आयुष्यातली एक स्त्री होती जिचा माझ्यावर खोलवर प्रभाव पडला…. त्यानंतर उर्मिला हिने कश्मिरी उद्योजक मोहसिन अख्तर मीर याच्यासोबत लग्न केलं. पण देघांचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 8 वर्षांनंतर उर्मिला हिने मोहसिन याला घटस्फोट दिला.
