Vivekanand Patil: आडवा आला त्याला तुडवायला शिका… अजिबात कर्ज भरू नका, विवेकानंद पाटील यांची जोरदार फटकेबाजी, ऊस आंदोलनात चढली धार
Swabhimani Shetkari Saghatana Sugarcane Protest: ऊस दर वाढीवरून पश्चिम महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानीने एल्गार पुकारला आहे. तर आता या आंदोलनाला विवेकानंद पाटील यांच्या तुफान फटकेबाजीने धार चढली आहे.

Vivekanand Patil on Sugarcane Protest: ऊसाची पहिली उचल 4200 रुपयांची असावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पश्चिम महाराष्ट्रात आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. पुणे-बंगळुरू महामार्ग गेल्या 48 तासांपासून ठप्प आहे. माल वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. कोट्यवधींच्या सामानाचे दळणवळण थंडावले आहे. राजू शेट्टी यांनी या आंदोलनाला ऊर्जा दिली आहे. तर अनेक शेतकरी रस्त्यावर उतरल्याने सरकारची दमकोंडी सुरू झाली आहे. सरकारच्या गोटातून आता आंदोलन मागे घेण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. त्याचवेळी MPSC आंदोलनाने महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेल्या विवेकानंद पाटील हा सुद्धा शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरला आहे. काल त्याने स्वाभिमानीच्या आंदोलनात तुफान फटकेबाजी केली. त्यामुळे या आंदोलनाला आता धार चढली आहे.
कुणब्याचा पोरा आता लढायला शिक
विवेकानंद पाटील याने शेतकऱ्यांच्या ऊसदरवाढीच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा दिला. त्याने सरकार आणि जिल्हा बँकावर आणि त्यांच्या धोरणावर कडक आसूड ओढला. “कुणब्याच्या पोरा आता तू लढायला शिक आणि घेतलेलं कर्ज बुडवायला शिक. सध्या कोरडा दुष्काळ पडलेला आहे. जिल्हा बँकेचे अधिकारी वसुलीला आले तर माझं नाव सांगा. ते माझा सत्कार करायला टपलेले आहेते. कारण मला चांगलं ठाऊक आहे की मलिदा कोण खात आहे ते. म्हणूनच कष्टायची भाजी-भाकरी, सुख साखरेची जोडी नको. म्हणून मी त्यांच्याकडे जात नाही.”, अशी तुफान फटकेबाजी या आंदोलनाच्या भाषणातून त्याने केली.
अन् आमची परिस्थिती हालखीचीच राहिली
शेतकऱ्यांच्या जिवावर मोठे झालेले नेते आज सकाळी सकाळी कमोडवर बसतात आणि आमची परिस्थिती मात्र अजूनही तीच जुनी, हलाखीची राहिली आहे. आता असे चालणा नाही. सरकारमधील सगळ्या नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे की, आधी आपल्या सत्तेच्या मदातून एक पाऊल खाली या. शेतकऱ्यांच्या झोपडीत जाऊन त्यांची परिस्थिती आणि दुःख काय आहे ते डोळे उघडून बघा, असा संतापही विवेकानंद पाटील यांनी या भाषणातून व्यक्त केला.
यावर्षी ऊसाला 4200 हजार रुपये पहिली उचल मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या दोन दिवसापासून पुणे बंगळुरू महामार्गावरील किनी टोल नाका इथं महामार्ग रोको आंदोलन सुरू आहे. विवेकानंद पाटील यांनी या शेतकरी संघटनेच्या आंदोलन स्थळी भेट दिली. आपल्या नेहमीच्या शैलीत त्याने या ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी सरकारला चर्चेचा आवाहन केलं आहे. विवेकानंद पाटील याला ऐकण्यासाठी हजारो शेतकरी रात्री उशिरापर्यंत आंदोलन स्थळी थांबून होते.