Gokul:’गोकुळ’वरून महायुतीतच चुरस, अध्यक्षपदाचा काय फॉर्म्युला ठरला? कुठल्या पक्षाला किती वर्षासाठी पद मिळणार?

Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्ष पदासाठी महायुतीतच चुरस दिसून येत आहे. अध्यक्षपदासाठी रात्रीतूनच चक्रं फिरली आणि फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. कुठल्या पक्षाला किती वर्षांसाठी मिळणार अध्यक्षपद?

Gokul:गोकुळवरून महायुतीतच चुरस, अध्यक्षपदाचा काय फॉर्म्युला ठरला? कुठल्या पक्षाला किती वर्षासाठी पद मिळणार?
अध्यक्षपदाचा काय फॉर्म्युला ठरला? कुठल्या पक्षाला किती वर्षासाठी पद मिळणार?
| Updated on: Nov 10, 2026 | 9:29 AM

Gokul Chairman Election 2026: कोल्हापूरचं राजकीय वर्तुळ ढवळून काढणाऱ्या गोकुळ, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपद निवडीचा अंतिम टप्पा आज पार पडत आहे. गोकुळवरून मोठे महाभारत सुरू आहे. महायुतीतच मोठी रस्सीखेच दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांनी अध्यक्षपदासाठी रात्रीतूनच फॉर्म्युला ठरवल्याची चर्चा होत आहे. त्यानुसार भाजप अध्यक्ष पदाच्या निवडीपासून दूर असेल. तर राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेत अध्यक्ष पद किती वर्षासाठी कुणाकडे असेल याचे गणित पक्कं करण्यात आले आहे.

चार शासननियुक्त संचालकांची भूमिका निर्णायक

Loading...

गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत 25 जागांपेकी सतेज पाटील यांच्या आघाडीने 13, तर महायुतीने 12 जागांवर विजय मिळवला होता. तर महायुतीने मोठी खेळी खेळली. गोकुळच्या संचालक मंडलावर शिवाजी आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे, प्रशांत पाटोळे आणि कृष्णात पाटील या चौघांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली. त्यांना अध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत मतदान करता येणार आहे. त्यामुळे बहुमत असतानाही चार शासननियुक्त संचालकांच्या मतांच्या बिदागीवर महायुतीचा अध्यक्ष निवडून येण्याची दाट शक्यता आहे.

महायुतीचा काय ठरला फॉर्म्युला?

महायुतीत अध्यक्ष पदावरून चुरस दिसून येत आहे. अध्यक्ष पदाच्या संधीत भाजपही समोर आली आहे. सोमवारी रात्री महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. त्यात सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे समोर येत आहे. त्यानुसार, अध्यक्ष पदाचा सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरला आहे. अध्यक्ष पदाची पहिली संधी राष्ट्रवादीला देण्याचे ठरले आहे. त्यानंतर हे पद भाजपकडे, अखेरच्या टप्प्यात शिवसेना आणि नंतरच्या काळात जनसुराज्य शक्ती पक्षाकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवण्याचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते.

अध्यक्षपदासाठी या नावाची चर्चा

गोकुळचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्यास माजी आमदार रणजीत पाटील आणि माजी आमदार राजेश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून अजित नरके यांचे नावं समोर येत आहे. भाजपला अध्यक्ष पद मिळाल्यास डॉ. चेतन नरके यांच्या नावाची चर्चा आहे. आज अध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. सकाळी अकरा वाजता ही प्रक्रिया सुरू होईल. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने 600 पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us