
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील डोल्हारीमध्ये मन सुन्न करणारी घटना घडलीय. शेतात पाणी पाजण्यासाठी गेलेल्या आजी -आजोबासह नातवाचा शॉक लागू मृत्यू झालाय. मारोतराव सुरदसे पत्नी मनकर्णाबाई सुरदसे आणि नातू सुमित सुरदसे अशी मृतांची नाव आहेत. या घटनेमुळं डोल्हारी परिसरात शोककळा पसरलीय.
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथे शेतात विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. मारोतराव सुरदसे (70) पत्नी मनकर्णाबाई सुरदसे (65) आणि त्यांचा नातु सुमित विनोद सुरदसे (16) असे मृतांची नावं आहेत.
डोल्हारी येथे मारोतराव सुरदसे यांचे घनापूर रस्त्यावर शेत आहे. शेतामध्ये त्यांनी हरभऱ्याची पेरणी केली. पिकाला पाणी देण्यासाठी सकाळी शेतात तिघेजण गेले होते. शेतातील लाईटजवळ मारोतराव यांना विजेचा शॉक लागल्याने ते जागीच कोसळले. त्यांना वाचवण्यासाठी पत्नी मनकर्णाबाई गेल्या. त्यांनाही विद्युत शॉक लागला. आजी आजोबांना जमिनीवर पडलेले पाहून शेतात असलेला नातू सुमित हा त्यांच्याकडे धावला. तेव्हा त्यालाही विजेचा जोरदार शॉक लागला. त्यामुळे तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे डोल्हारी परिसरात शोककळा पसरली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृत्युची नोंद घेतली. तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
इतर बातम्या:
चंद्रपूरमध्ये बर्निंग कारचा थरार, काही मिनिंटामध्ये होत्याचं नव्हतं, पाहा व्हिडीओ
Yavatmal Dolhari Darvha three died due to electric current in farm