AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या चार जिल्ह्यात पावसाने घातला धुमाकूळ, 16 मेंढ्या दगावल्या, पीकाचं नुकसान

अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी गाराही पडल्या, तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.

या चार जिल्ह्यात पावसाने घातला धुमाकूळ, 16 मेंढ्या दगावल्या, पीकाचं नुकसान
फाईल चित्रंImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 06, 2023 | 2:16 PM
Share

पालघर : अवकाळी पावसाने विजांचा कडकडाटासह पालघर (palghar) जिल्ह्यात मुसळधार (heavy rain) हजेरी लावली असून पालघर जिल्ह्यात पुढील तासभर विजांच्या कडकडाटच प्रमाण वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून डहाणू सह परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात 4 मार्च ते 6 मार्च दरम्यान पावसाची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. रात्री जिल्ह्यात मुसळधार झालेल्या पावसाने पहाटे काही प्रमाणात विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला असून या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील बागायतदार आणि फळ भाजी उत्पादक शेतकरी (farmer) मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस.

बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. विशेष म्हणजे तर काही ठिकाणी वीज पडण्याच्याही सुध्दा घटना घडल्या आहेत. बुलढाण्याच्या शेजारी असलेले साखळी नावाच्या गावात वीज पडल्याने मेंढपाळाच्या तब्बल 16 मेंढ्या दगावलेल्या आहेत. तर पाच ते सहा मेंढ्या जखमी झाल्या आहेत. महसूल विभागाकडून पंचनामा सुरू आहे. मात्र मेंढपाळ यांचं मोठ नुकसान झाल्याचे पाहायला मिळते आहे.

शहरासह जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, नाशिक शहर आणि जिल्ह्यात रात्रभर जोरदार अवकाळी पाऊस झाला. शहरात मध्यरात्री 2 वाजता विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मात्र या अवकाळी पावसाने आता पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत आले असून, ग्रामीण भागात कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, द्राक्षे आणि कोबी या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच आजच्या होळीच्या उत्सवावर देखील पावसाचे सावट असून, आज आणि उद्या हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी गाराही पडल्या, तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आज सकाळी देखील जिल्ह्यात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे.

शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.