पालघरमधील ‘त्या’ नवजात बाळाची झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू  

| Updated on: Jun 06, 2021 | 6:45 AM

मात्र अखेर त्याची झुंज अपयशी ठरली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर अनेक सवाल उपस्थित होत आहेत. (Palghar Corona Infected New Born Baby died)

पालघरमधील त्या नवजात बाळाची झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू  
new born baby
Follow us on

पालघर : पालघरमध्ये काही दिवसांपूर्वी एका नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली होती. दुर्देवाने या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून हे बाळ मरणाशी झुंज देत होते. मात्र अखेर त्याची झुंज अपयशी ठरली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर अनेक सवाल उपस्थित होत आहेत. (Palghar Corona Infected New Born Baby died)

सहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडवली आहे. कोरोनाग्रस्त मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेचा कहर थांबत नाही, तोच तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. पालघरमधील सफाळे येथील टेकरीचा पाडा या ठिकाणी राहणाऱ्या एका नवजात बालकाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. हे बाळ जन्माला आल्यानंतर 12 तासाने त्याची कोरोना अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

उपचारासाठी फरफट

यानंतर त्याच्यावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र तिथे लहान बालकांसाठी कोणतीही आरोग्य सुविधा उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे कोरोना लागण झालेल्या या बाळाला उपचारासाठी वणवण करावी लागली. उपचारासाठी अनेक तासाची फरफट झाल्यानंतर त्या बालकाला जव्हार येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र दिवसेंदिवस बाळाची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे त्याला जव्हार रुग्णालयातून नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मृत्यूशी झुंज अपयशी

गेले सहा दिवस हे बाळ मारणाशी झुंज देत होते. मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली आहे. काल (5 जून) सकाळी पाचच्या सुमारास या नवजात बालकाचा मृत्यू झाला. हे नवजात बाळ गेल्या सहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहे. मात्र तरीही उपचाराअभावी त्याला हार पत्करावी लागल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

आरोग्य विभागाची चिंता वाढली 

दरम्यान पहिल्यांदा अशाप्रकारे एका नवजात बाळाला कोरोना झाल्याची घटना समोर आली होती. त्या बालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच या घटनेमुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत.

तिसरी लाट रोखण्यासाठी संकल्प

दरम्यान, दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचे आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करून देशासाठी एक उत्तम उदहारण घालून द्या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. (Palghar Corona Infected New Born Baby died)

संबंधित बातम्या : 

पालघरमध्ये नवजात बाळाला कोरोनाची लागण, आईची चाचणी मात्र निगेटिव्ह

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढे यावे, मुख्यमंत्र्यांचं आवाहन