
मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गाैरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या केली. फेब्रुवारी महिन्यातच दोघांचे लग्न झाले होते. या लग्नाला पंकजा मुंडे आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत उपस्थित होत्या. पंकजा मुंडे अनंत गर्जेला मुलासारखे मानत. पंकजा मुंडेंसोबत मागील काही वर्षांपासून पीए म्हणून अनंत गर्जे काम करत. अत्यंत थाटामाटात गाैरी आणि अनंत यांचा विवाहसोहळा पार पडला. अनंत गर्जे यांच्या पत्नी मुंबईतील केईएम रूग्णालयात कार्यरत होत्या. गाैरीच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केली असून ही आत्महत्या नाही तर हत्याच असल्याचा दावा त्यांनी केला. कोणत्याही परिस्थितीमध्ये अनंत गर्जेविरोधीत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. अनंत गर्जे आणि त्यांच्या मुलीमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार वार सुरू होते. काल दोघांमधील वाद सुरू होता.
तिने अगोदरच तिच्या वडिलांना याबाबत माहिती दिली होती. अनंत गर्जेचे बाहेर काही संबंध असल्याने गाैरी त्रस्त होती. तो मुलींना चॅटिंग करत असल्याने तिने तिच्या वडिलांना सांगितले होते. हेच नाही तर गाैरीच्या कुटुंबियांनी मोठा दावा करत म्हटले की, काल दोघांमध्ये खूप भांडणे सुरू होती, हेच नाही तर आमच्या मुलीने अनंत गर्जेसमोर आत्महत्या केली. ज्यावेळी तिने आत्महत्या केली त्यावेळी तो घरातच होता.
तिचा छळ केला जात होता. गाैरीच्या आत्महत्येबद्दल कळताच बीडवरून तिचे नातेवाईक मुंबईतील वरळी पोलिस ठाण्यात पोहोचले. अनंत गर्जेच्या पत्नीच्या नातेवाईकांनी आरोप केला की, ज्यावेळी गाैरीने आत्महत्या केली त्यावेळी दोघांमध्ये वाद सुरू होता आणि त्यादरम्यान अनंत घरात होता त्याच्यासमोरच तिने आत्महत्या केली. मात्र, आता हा दावा खोटा असल्याने पंकजा मुंडेच्या पीएने म्हटले आहे.
अनंत गर्जेने नुकताच म्हटले की, ज्यावेळी गाैरीने आत्महत्या केली, त्यावेळी मी घरी नव्हतो. घराची सर्व दारे बंद होती. 31 व्या मजल्याच्या खिडकीवरून मी 30 व्या मजल्याच्या आमच्या घरात पोहोचलो. ज्यावेळी मी घरात दाखल झालो, त्यावेली गाैरीने आत्महत्या केली. मी तिला तशाच अवस्थेत घेऊन रूग्णालयात पोहोचलो.