AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवाब मलिकांच्या ताफ्यासमोर मानसेवी शिक्षकांची घोषणाबाजी, पोलिसांची तारांबळ

आपल्या मागण्या घेऊन गेलेल्या शिक्षकांवरच मंत्रिमहोदय भडकल्यामुळे शिक्षकही आक्रमक झाले. त्यांनी नवाब मलिक यांच्या ताफ्यासमोरच मानसेवी शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

नवाब मलिकांच्या ताफ्यासमोर मानसेवी शिक्षकांची घोषणाबाजी, पोलिसांची तारांबळ
| Updated on: Jan 24, 2021 | 5:03 PM
Share

परभणी : स्पर्धा परीक्षांमध्ये अमराठी शाळेतील विद्यार्थी मागे पडू नयेत म्हणून 8 ते 10 वीच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी सरकारनं 2010 साली मराठी भाषेचे फाऊंडेशन वर्ग सुरु केले. यासाठी मानसेवी शिक्षकांची 5 हजार रुपये प्रति महिना मानधनावर नेमणूक करण्यात आली. मात्र, यंत्रा मानसेवी शिक्षकांना अल्पसंख्याक विभागाकडून नियुक्त्याच देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मानसेवी शिक्षक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.(Mansewi teachers shouting slogans in front of Minister Nawab Malik)

राज्य सरकारनं 2010 साली मानसेवी शिक्षकांनी 5 हजार रुपये प्रति महिना मानधनावर नियुक्ती केली होती. राज्यात असेल 1 हजार 30 एम.ए. बीएड पात्रताधारक शिक्षक आहेत. हे शिक्षक उर्दु माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी शिकवण्याचं काम करतात. पण यंदा मानसेवी शिक्षकांना अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं नियुक्तीच देण्यात आली नाही. त्याचबरोबर या शिक्षकांचं मागील वर्षातील 3 महिन्यांचं मानधनही थकलं आहे. हे थकीत मानधन देण्यात यावं. चालू वर्षात नियुक्ती द्यावी, शिवाय मानसेवी शिक्षकांना कायम करण्यात यावं, अशी मागणी या शिक्षकांची आहे.

काही शिक्षक आपल्या मागण्यांचं निवेदन घेऊन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना भेटले आणि त्यांना निवेदन दिलं. तेव्हा नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मानसेवी शिक्षक भडकले आणि त्यांनी मलिकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सदर मानसेवी शिक्षक हे शासनाची फसवणूक करत आहेत. तुम्हाला कायमस्वरुपी नियुक्ती कशी द्यावी? तुम्ही एकच तास शिकवता, असं नवाब मलिक म्हणाले. आपल्या मागण्या घेऊन गेलेल्या शिक्षकांवरच मंत्रिमहोदय भडकल्यामुळे शिक्षकही आक्रमक झाले. त्यांनी नवाब मलिक यांच्या ताफ्यासमोरच मानसेवी शिक्षकांना कायस्वरुपी नियुक्ती मिळालीच पाहीजे, अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना निषेध असो, अशा घोषणा दिल्या. स्वत: नवाब मलिक या ताफ्यात असल्यामुळे पोलिस प्रशासनाची काही काळ चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

गेल्या सरकारमध्ये मोठा शिक्षक भरती घोटाळा – प्रकाश शेंडगे

“गेल्या सरकारच्या काळात मोठा शिक्षक भरती घोटाळा झाला,” असे मोठा आरोप ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी 17 जानेवारीला केला आहे.  “या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच रखडलेली भरती परत सुरु करा,” असेही प्रकाश शेंडगे म्हणाले.

इतर बातम्या :

मुख्यमंत्रीपदाची मागणी ओबीसींची तशीच दलितांचीही, पण उद्धव ठाकरेंमुळे होणार नाही – आठवले

रोहित पवार का म्हणतात राजकारणात आल्यावर पन्नास टक्के केस पांढरे झाले?

Mansewi teachers shouting slogans in front of Minister Nawab Malik

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.