PCMC Election 2026 Exit Poll : अजितदादांना भाजपचा घरातच मोठा धक्का, पिंपरी चिंचवडमध्ये गेम पालटला, एक्झिट पोलच्या आकड्यांनी खळबळ

PCMC Election 2026 Exit Poll Stats : पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीचा सामना पहायला मिळाला होता. आता या महानगरपालिकेचा एक्झिट पोल समोर आला आहे.

PCMC Election 2026 Exit Poll : अजितदादांना भाजपचा घरातच मोठा धक्का, पिंपरी चिंचवडमध्ये गेम पालटला, एक्झिट पोलच्या आकड्यांनी खळबळ
Ajit Pawar and Fadnavis
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 15, 2026 | 7:15 PM

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. उद्या 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीचा सामना पहायला मिळाला होता. या महापालिकेत एकूण 32 प्रभागातून 128 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. अशातच आता या महानगर पालिकेचा एक्झिट पोल समोर आला आहे. यात भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे.

भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता

PRAB च्या एक्झिट पोलनुसार पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. येथे भाजपला 64 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अजित दादांच्या राष्ट्रवादीला 51, शिवसेनेला 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2, काँग्रेसला 1 आणि मनसेला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या महानगर पालिकेत पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.

Live

Municipal Election 2026

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:47 PM

संभाजीनगर : निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार - किशोर शितोळे

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

10:34 PM

सर्व्हेतून सर्वात मोठी माहिती पुढे... भाजपची मतांच्या टक्केवारीतही आघाडी, ठाकरे मागे

05:32 PM

Nashik Election Poll Percentage : नाशिक महापालिकेसाठी 4.30 वाजेपर्यंत 41 टक्के मतदान

अजित पवारांना मोठा धक्का

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता येण्याचा अंदाज आहे, हा अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारासाठी तळ ठोकला होता. पिंपरीत अजित पवारांना अनेक प्रचारसभा घेतल्या होत्या. तसेच भाजपावर गंभीर आरोप केले होते, मात्र आता मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवल्याचे दिसत आहे. त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.

पुण्यातही भाजपची सत्ता

पुणे महापालिकेच्या निवडणुकीचाही एक्झिट पोल समोर आला आहे. जनमतच्या एक्झिट पोलनुसार पुण्यामध्ये पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, पुण्यात भाजपला 93 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर शिवसेनेला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला एकूण सात जागा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला 43 तरे राष्ट्रवादी शरद पवार गटाला 8 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या एक्झिट पोलनुसार मनसेला तर पुण्यात खातं देखील उघडता आलेलं नाहीये, तर अपक्ष दोन ते तीन ठिकाणी विजयी होण्याचा अंदाज आहे.