एमपीएससी आंदोलनाला परवानगी नाकारली, तरीही रोहित पवार मैदानात उतरणारच, पुण्यात वातावरण तापणार

एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी 27 सप्टेंबर रोजी पुण्यात आंदोलन होणार आहे. पोलिसांनी मात्र या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. मात्र रोहित पवार या आंदोलनावर ठाम आहेत.

एमपीएससी आंदोलनाला परवानगी नाकारली, तरीही रोहित पवार मैदानात उतरणारच, पुण्यात वातावरण तापणार
rohit pawar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 22, 2026 | 9:36 PM

एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी 27 सप्टेंबर रोजी पुण्यात आंदोलन होणार आहे. पोलिसांनी मात्र या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सवाचं कारण देत पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. दरम्यान या आंदोलनाला काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित राहू शकतात, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पोलिसांनी जरी परवानगी नाकारली असली तरी 27 सप्टेंबरला कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन करणारच असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वात एमपीएससीचे विद्यार्थी हे आंदोलन करणार आहेत. परंतु या आंदोलनासाठी गणेशोत्सवाचं कारण देत पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सव काळात मोर्चे आणि आंदोलन करण्यासाठी आम्ही परवानगी देऊ शकत नाही, असं पुणे पोलिसांनी रोहित पवार यांना सांगितलं आहे.

पुण्याच्या शास्त्री चौकात आंदोलन करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी पुणे पोलिसांकडे रोहित पवार यांनी केली होती. परंतु शास्त्री चौकात कलम 163 लागू असल्यामुळे परवानगी देता येणार नाही, असं पोलिसांनी सांगितलं. शास्त्री रोडऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करा असा पर्याय देखील पोलिसांनी रोहित पवार यांना दिला. मात्र कोणत्याही परिस्थितीत 27 तारखेला पुण्यात आंदोलन करणारच असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 27 तारखेला आंदोलन होणार म्हणजे होणारच, आणि जर हे आंदोल व्हावं असं वाटत नसेल तर आम्ही सरकारकडे पाच मागण्या केल्या आहेत, त्या संदर्भात सरकारने विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करवी, असं देखील रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

वातावरण तापण्याची शक्यता 

एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी 27 सप्टेंबर रोजी पुण्यात आंदोलन होणार आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. परंतु पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. परंतु दुसरीकडे हे आंदोलन होणारच असा इशारा रोहित पवार यांनी दिला  आहे. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. पोलिसांनी परवानगी नाकरल्यानंतर देखील पुण्यात आंदोलन होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us