प्रसिद्ध माधुरी हत्तीणीला कोल्हापूरच्या नांदिणी मठात आणण्याच्या प्रयत्नांना पेटाचा धक्का, मोठी बातमी समोर

कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीची घरवापसी अंतिम टप्प्यात आहे. माधुरी हत्तीणीबाबतची उच्चस्तरीय समिती समोरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र त्यानंतर आता एक मोठी बातमी समरो आली आहे.

प्रसिद्ध माधुरी हत्तीणीला कोल्हापूरच्या नांदिणी मठात आणण्याच्या प्रयत्नांना पेटाचा धक्का, मोठी बातमी समोर
Madhuri elephant
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 10, 2026 | 3:11 PM

कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीची घरवापसी अंतिम टप्प्यात आहे. माधुरी हत्तीणीबाबतची उच्चस्तरीय समिती समोरील सुनावणी पूर्ण झाली आहे. अंतिम सुनावणीमध्ये नांदणी मठामध्ये माधुरी हत्तीणीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या सुविधांची सविस्तर माहिती देखील देण्यात आली आहे. अंतिम सुनावणी नंतर उच्च स्तरीय समितीने आपला निकाल राखून ठेवला, परंतु आता पेटाने एक मोठा धक्का दिला आहे. माधुरी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्याच्या हालचाली सुरू असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. पेटाकडून राज्य सरकारला पत्र पाठवण्यात आलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीची घरवापसी अंतिम टप्प्यात आहे. माधुरी हत्तीणीबाबतची उच्चस्तरीय समिती समोरील सुनावणी पूर्ण झाली आहे. अंतिम सुनावणीमध्ये नांदणी मठामध्ये माधुरी हत्तींणीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या सुविधांची सविस्तर माहिती देखील देण्यात आली आहे.  परंतु आता पेटाकडून राज्य सरकारला पत्र पाठवण्यात आलं आहे. माधुरी हत्तीणीला वन तारामध्येच ठेवा असं या पत्रामध्ये म्हटलं आहे.  माधुरी हत्तीणीला नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच पेटाकडून पुन्हा राज्य सरकारला पत्र पाठवण्यात आलं आहे, त्यामुळे आता यावर सरकार काय निर्णय घेणार?  माधुरी नांदणी मठामध्ये पुन्हा परतणार का? याकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे.

काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातल्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला  गुजरातच्या वनतारामध्ये सोपवण्यात आलं होतं. नांदणी मठात माधुरी हत्तीणीसाठी आवश्यक असलेल्या सोई सुविधा नसल्याचं कारण त्यासाठी देण्यात आलं होतं. परंतु माधुरी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये सोपवण्यास स्थानिकांचा प्रचंड विरोध होता. मात्र तरी देखील या हत्तीणीला वनतारामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा या हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माधुरी हत्तीणीबाबतची उच्चस्तरीय समिती समोरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र या सर्व घडामोडी घडत असतानाच आता पेटाने मोठा धक्का दिला आहे,  पेटाने राज्य सरकारला पत्र पाठवलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us