ठाकरे गट शरद पवारांना जबर धक्का देण्याच्या तयारीत, लवकरच…3 प्लॅन समोर आल्याने खळबळ!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. येथे ठाकरे गट धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता आहे.

ठाकरे गट शरद पवारांना जबर धक्का देण्याच्या तयारीत, लवकरच...3 प्लॅन समोर आल्याने खळबळ!
uddhav thackeray and sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 27, 2025 | 6:39 PM

Pimpri Chincwad Municipal Election : सध्या राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. स्थानिक नेते तसेच अनेक माजी मंत्री, माजी आमदार, माजी खासदारांनी आगामी राजकीय सोय पाहून पक्षांत केले आहे. दुसरीकडे त्या-त्या शहरातील महापालिकांवर विजयी पताका फडकवण्यासाठी स्थानिक पातळीवर युती आणि आघाडी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक शहरांत यावेळी वेगवेगळे प्रयोग पहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण या शहरात विरोधी बाकावर असलेल्या ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आता याच संभाव्य युतीबाबत खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेमळे येथे ठाकरेंची शिवसेना लवकरच मोठा आणि वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

नेमकी काय माहिती समोर आली आहे?

मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत, अशी चर्चा चालू आहे. याच चर्चेचे पडसाद महाविकास आघाडीच्या पार पडलेल्या बैठकीत पहायला मिळाले. या बैठकीला शरद पवारांची राष्ट्रवादी अनुपस्थित राहिली. त्यामुळे मविआने शरद पवार राष्ट्रवादीला अल्टीमेटम दिले आहे. आजच्या बैठकीत मविआने तीन प्लॅन तयार ठेवले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा इशारा ठाकरे सेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी दिला आहे. या बैठकीत शरद पवार राष्ट्रवादी सोबत मविआ असा प्लॅन ए, शरद पवार राष्ट्रवादी विना मविआ असा प्लॅन बी आणि ठाकरे सेना – मनसे युती असा प्लॅन सी तयार करण्यात आल्याचे, सचिन अहिर यांनी सांगितले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अल्टिमेटम दिला

या प्लॅनबाबत बोलताना अहिर म्हणाले की, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी तीन वाजता बैठक होती. पण कुणीच आलं नाही. संध्याकाळी आपण चर्चा करू असा अमोल कोल्हे यांचा फोन आला होता. आमची काँग्रेससोबत बैठक पूर्ण झाली. आमची मनसेसोबतही जागांबाबत चर्चा झाली आहे. यासह त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी काही निर्णय न घेतल्यास नाईलाजाने आम्हाला पुढे जावं लागेल. उद्यापर्यंत याबाबत निर्णय होणं अपेक्षित आहे, असेही अहिर म्हणाले.