महाराष्ट्र गाठतोय विकृतीचा कळस! 60 वर्षांच्या नराधमाने 2 सख्या बहिणींचे वारंवार तोडले लचके… घटना कशी आली समोर?

महाराष्ट्रात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. 60 वर्षांच्या नराधमाने दोन सख्या बहिणींवर अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहिणींचं वय फक्त 10 आणि 5 वर्ष आहे... नराधमाने याआधी देखील मुलींवर अत्याचार केले... कशी समोर आणि धक्कादायक घटना...

महाराष्ट्र गाठतोय विकृतीचा कळस! 60 वर्षांच्या नराधमाने 2 सख्या बहिणींचे वारंवार तोडले लचके... घटना कशी आली समोर?
क्राईम फाईल इमेज
| Updated on: Jul 28, 2026 | 9:52 AM

काही महिन्यांपू्र्वी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली… 62 वर्षीय भीमराम कांबळे याने चिमुकलीवर अत्याचार केले आणि तिची हत्या केली. आता देखील 60 वर्षाच्या नराधमाने दोन सख्या बहिणींवर अत्याचार केल्याची घटना समोर येत आहे, ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये घडली आहे. एका 60 वर्षाच्या नराधमाने दोन सख्या बहिणींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची आल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या दोन सख्या बहिणींचं वय मिळालेल्या माहितीनुसार, 10 आणि 5 वर्ष आहे. घडलेल्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणात पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी आणि संतप्त नागरिकांनी नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सोमवारी रात्री वाकड पोलीस स्टेशनमध्ये मोठी गर्दी केली होती. त्यानंतर वाकड पोलिसांनी नराधमाला ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

घटना कशी आली समोर…

मुली घरात आई – वडील, आजी – आजोबा यांच्यासोबत राहतात, तर शेजारी राहत असलेला नराधम बायको आणि मुलासोबत राहत असल्याची माहिती समोर येत आहे. पीडितेचे आई – वडील, आजी -आजोबा असे सगळेच कामासाठी बाहेर केले… तर नराधमाची बायको आणि मुलगा देखील मजुरीसाठी घराबाहेर पडले. तेव्हा 10 वर्षांची मुलगी कपडे धुण्यासाठी घराबाहेर आली, तेव्हा आजूबाजूला कोणी आहे की नाही पाहताच, नराधम पीडितेचे तोंड दाबून लगतच्या स्वतःच्या घरी घेऊन गेला. घडत असलेला हा सर्व प्रकार शेजारी राहणाऱ्या महिलेने पाहिला आणि पीडितेच्या आईला सांगितला.

त्यानंतर पीडितेला विचारल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं… नराधमाने पहिल्यांदाच असं कृत्य केलं नव्हतं. याआधी मे महिन्यात पहिल्यांदा त्यानंतर तीन वेळा.. असं चार वेळा नराधमाने 10 वर्षीय मुलीवर तोंड दाबून अत्याचार केले. एवंढच नाही तर, कुटुंबियांना तेव्हा मोठा धक्का बसला जेव्हा पीडितेने सांगितलं की, पाच वर्षीय बहिणीवर देखील नराधमाने तोंड दाबून अत्याचार केले. सध्या याप्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us