AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरी-चिंचवड गोळीबार प्रकरणात सर्वात मोठा खुलासा! बिश्नोई गँगचे ३ शूटर गजाआड; ‘सिद्धू मूसेवाला’ कनेक्शन उघड!

पिंपरी-चिंचवड गोळीबारात मोठा खुलासा! पोलिसांनी बिश्नोई गँगच्या ३ शूटरना उत्तराखंडमधून अटक केली आहे. या घटनेचे धागेदोरे सिद्धू मूसेवाला हत्याकांडाशी जोडले गेले असून, २ कोटींच्या खंडणीसाठी हा प्रकार घडला. पुणे-पिंपरीतील व्यापारी बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याची भीती या घटनेमुळे व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवड गोळीबार प्रकरणात सर्वात मोठा खुलासा! बिश्नोई गँगचे ३ शूटर गजाआड; 'सिद्धू मूसेवाला' कनेक्शन उघड!
| Updated on: May 22, 2026 | 12:21 PM
Share

पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडवणाऱ्या ‘ए. जे. फर्निचर मॉल’ गोळीबार प्रकरणाचा पोलिसांनी थरारक उलगडा केला आहे. या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी थेट उत्तराखंडमधील हरिद्वार येथून बिश्नोई गँगच्या तीन शूटरना अटक केली असून, या तपासातून सिद्धू मूसेवाला हत्याकांडाशी संबंधित धक्कादायक धागेदोरे समोर आले आहेत. तब्बल दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हा संपूर्ण कट रचण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नेमका काय आहे हा प्रकार? जाणून घेऊया.

15 मे 2026 रोजी रात्री सुमारे 9 च्या सुमारास रावेत-ताथवडे बीआरटी रोडवरील ‘ए. जे. फर्निचर मॉल’बाहेर मॉलचे मालक जगदीश बिश्नोई बसलेले असताना दोन अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जगदीश बिश्नोई यांच्या दिशेने सलग ५ ते ६ गोळ्या झाडल्या. सुदैवाने या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. मात्र, या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले, सगळे हादरले.

या गोळीबारामागची पार्श्वभूमी आणखी धक्कादायक आहे. 7 मे रोजी जगदीश बिश्नोई यांचे भागीदार अशोक कुमार बिश्नोई यांना एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल आला होता. फोनवरून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, बिश्नोई यानी या कॉलला प्रतिसाद दिला नाही, तेच महागात पडलं. या धमकीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानंतरच हा जीवघेणा हल्ला घडवून आणल्याचे समोर आले आहे.

शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना अटक

या गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार सात विशेष पथके तयार करण्यात आली. गुंडा विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट-२ यांनी तब्बल 350 ते 400 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढत पोलिसांनी प्रथम हरियाणा आणि त्यानंतर उत्तराखंडमधील हरिद्वार येथे धाड टाकली. हरिद्वारमधील एका लॉजमधून तिन्ही शूटरना अटक करण्यात आली.

सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपीचाही सहभाग

चौकशीदरम्यान आरोपींकडून अनेक धक्कादायक माहिती समोर आली. हा हल्ला बिश्नोई गँगशी संबंधित आरजू बिश्नोई, शुभम लोणकर आणि कुलदीप उर्फ कशीश यांच्या सूचनेवरून करण्यात आल्याचे आरोपींनी कबूल केले. विशेष म्हणजे, कुलदीप उर्फ कशीश हा प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या टोळीने शूटरना पिस्तुले, काडतुसे, पैसे आणि वाहनांची व्यवस्था करून दिली होती.

तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. बिश्नोई गँगने दिघी परिसरातील ‘वीर फर्निचर’च्या मालकालाही अशाच प्रकारे खंडणीसाठी धमकी दिली होती. त्यामुळे पुण्यातील व्यापारी वर्ग आता बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना 28 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील आणखी धागेदोरे शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे असं पिंपरी चिंचवडच्या सहपोलीस आयुक्तांनी सांगितलं.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ