AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधानांचं आवाहन… सुप्रिया सुळे यांच्या व्याहींनी घेतला मोठा निर्णय, थेट रिसेप्शनच…

जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन संकट गहिरे होत असल्याने पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीचे आवाहन केले आहे. याला प्रतिसाद देत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांनी नागपूरचे रिसेप्शन रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सुळे यांनी कर्जमाफीतील अस्पष्टता आणि राज्याच्या आर्थिक स्थितीवरही यावेळी भाष्य केले.

पंतप्रधानांचं आवाहन... सुप्रिया सुळे यांच्या व्याहींनी घेतला मोठा निर्णय, थेट रिसेप्शनच...
सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि अरुण लखानी यांचा पुत्र सारंग यांचा विवाह होणार आहे.
| Updated on: Jun 11, 2026 | 2:05 PM
Share

अमेरिका-इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगभरात इंधनाचं मोठं संकट निर्माण झालं आहे. भारतालाही या युद्धाची मोठी झळ पोहोचली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून इंधन बचतीचं आवाहन केलं आहे. सार्वजनिक वाहनांनी प्रवास करा, परदेशवारी करू नका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्याला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. राजकारण्यांपाठोपाठ सामान्य नागरिकही इंधन बचत करताना दिसत आहेत. पंतप्रधानांच्या या आवाहनाला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांनीही प्रतिसाद दिला आहे. लखांनी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी नागपूरचं रिसेप्शनच रद्द केलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे मीडियाशी संवाद साधत होत्या. पंतप्रधानांनी सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. पण सगळ्यांचे ताफे दिसत आहेत. महाराष्ट्रात अजूनही खासगी विमान सेवा सुरू आहे का? असा सवाल करतानाच माझ्या व्याहींनी नागपूरचं रिसेप्शन पुढं ढकललं आहे. पंतप्रधानांनी खर्च कमी करायला सांगितलं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांची कन्येला उद्योगपती अरुण लखानी यांच्या मुलाला दिली आहे. या पार्श्वभूमीवर लखानी यांनी रिसेप्शन पुढे ढकललं आहे.

कर्जमाफीत स्पष्टता नाही

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरही भाष्य केलं. कर्जमाफीबद्दल सरकारकडून अजून स्पष्टता आलेली नाही. सरकारने पत्रकार परिषद घ्यावी आणि माहिती द्यावी. नाही तर लाडकी बहिणी योजनेसारखी परिस्थिती होईल. जनधन योजनेचा इतका गाजावाजा केला. आता त्यालाच का लाडक्या बहिणीशी जोडलं? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. जशी लाडकी बहीण योजनेत फसवाफसवी झाली. तशीच काहीशी कर्जमाफीबदल होईल, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

आर्थिक स्थिती नाजूक

माहिती अशी मिळत आहे की सर्व शिक्षण अभियान आणि सामाजिक न्याय विभागाचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वापरेल जात आहेत. वर्तमानपत्रात हे वारंवार येत आहे. महाराष्ट्रची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. राज्यातील अर्थतज्ज्ञ हे आर्थिक धोरण ठरवतील. देशाची परिस्थिती अडचणीची आहे. सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवा अशी मागणी मी पंतप्रधानांकडे वारंवार केली आहे, असंही त्या म्हणाल्या.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...