स्वदेशीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं आवाहन,काय म्हणाले नेमकं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीमुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आज भव्य सोहळ्यात करण्यात आले. नवीमुंबईतील उलवे येथे झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापु, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वदेशीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं आवाहन,काय म्हणाले नेमकं?
| Updated on: Oct 08, 2025 | 5:17 PM

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नवनवीन प्रकल्प होत आहेत. त्यामुळे रोजगारात वाढ होत आहे असे सांगितले. ते पुढे म्हणाले की देशाची एव्हीएशन इंडस्ट्री वाढत आहे. जेव्हा स्वप्न सिद्ध करण्याचा संकल्प असतो तेव्हा त्याचा परिणामही मिळतो. आपली हवाई सेवा आणि त्याच्याशी संबंधित इंडस्ट्री याचं मोठं उहादरण आहे. मला २०१४ मध्ये मला संधी मिळाली. तेव्हा मी म्हटलं होतं हवाई चप्पल घालणारा हवाई प्रवास करता आला पाहिजे असे मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की त्या मिशनवर आम्ही काम केलं. गेल्या ११ वर्षात देशात एकानंतर दुसरे एअरपोर्ट झाले. २०१४ मध्ये देशात ७४ विमानतळ होते. आता १६० हून ही संख्या अधिक झाले. जेव्हा देशाच्या छोट्या शहरात विमानतळ बनतात तेव्हा तिथल्या लोकांना हवाई प्रवासाचा पर्याय मिळतो. लोकांना स्वस्तात तिकट मिळावं म्हणून आम्ही उड्डाण योजना आणली. लाखो लोकांना हवाई प्रवास करता आला आहे असेही मोदी यांनी सांगितले.

विमान बनवणाऱ्या विमानतळ कंपन्यांकडे एक हजार विमानांची ऑर्डर बूक झाली आहे. त्यामुळे पायलट ही तयार होतील. भारत हा एमआरओ हब बनवणे हे आमचं लक्ष आहे. त्यातही रोजगाराच्या संधी निर्माण केली जाणार आहे. आमची ताकद तरुण आहेत. त्यामुळे आमच्या धोरणाचा फोकस तरुणांना रोजगार देण्यावर आहे. पायाभूत सुविधा तयार केल्यावर रोजगार मिळतो. व्यापार वाढतो तेव्हा रोजगार वाढतो. राष्ट्र नीती राजनीतीचा आधार असतो अशा संस्कारातून आम्ही आलोय असे यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी स्वदेशीचा मंत्र दिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आवाहन केले की स्वदेशीच स्वीकारा.अभिमानाने सांगा आम्ही स्वदेशी आहोत. प्रत्येक देशवासियाने स्वदेशी वस्तूच खरेदी कराव्या.गिफ्टही स्वदेशीच द्यावा. त्यामुळे देशाचा पैसा देशातच राहील. संपूर्ण भारत स्वदेशीचा स्वीकार करेल तर देशाचं सामर्थ्य किती वाढेल याचा विचार करा.