Pune PMPML : तब्बल दोन वर्षानंतर पुण्यात पीएमपीएमएल रुळावर! मात्र, आर्थिक अडचणीमुळे पुणेकरांचा खोळंबा होणार?

| Updated on: Mar 15, 2022 | 5:41 PM

पुणेकरांची हक्काची पीएमपीएमएल बससेवाही रुळावर येताना पाहायला मिळतेय. काल एका दिवसात 9 लाख 15 हजार जणांनी पीएमपीएमएलच्या 1 हजार 590 गाडांनी प्रवास केला. त्यामुळे पीएमपीएमएला 1 कोटी 53 लाखाचं उत्पन्न मिळालं आहे. तशी माहिती पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिलीय. असं असलं तरी पुढील काळात पुणेकरांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे!

Pune PMPML : तब्बल दोन वर्षानंतर पुण्यात पीएमपीएमएल रुळावर! मात्र, आर्थिक अडचणीमुळे पुणेकरांचा खोळंबा होणार?
पुण्यातील पीएमपीएमएल बस सेवा
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : राज्यात किंबहुना देशात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आला होता. त्यानंतर पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्यानं वाढताना दिसला. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारच्या (Central and State Government) उपाययोजना, प्रशासनाचं योग्य नियोजन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पुणेकरांनी दाखवलेली जागृती यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आता सर्व गोष्टी सुरळीत होत असताना पुणेकरांची हक्काची पीएमपीएमएल बससेवाही (PMPML Bus) रुळावर येताना पाहायला मिळतेय. काल एका दिवसात 9 लाख 15 हजार जणांनी पीएमपीएमएलच्या 1 हजार 590 गाडांनी प्रवास केला. त्यामुळे पीएमपीएमएला 1 कोटी 53 लाखाचं उत्पन्न मिळालं आहे. तशी माहिती पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे (Dattatray Zende) यांनी दिलीय. असं असलं तरी पुढील काळात पुणेकरांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे!

पुण्यात 1 हजार बसेस चालवणाऱ्या कंत्राटदारांनी पीएमपीएमएलला पत्र लिहून बिल न मिळाल्यानं आर्थिक अडचणीत सापडून सेवा चालवण्यास असमर्थ ठरण्याची भीती व्यक्त केलीय. कारण ऑपरेटर कंपन्यांना 6 महिन्यांपासून निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे ऑपरेटर कंपन्या जवळपास 1 हजार गाड्या जागेवर उभ्या करण्याची शक्यता निर्माण झालीय. 1 हजार बसेस पुण्याच्या रस्त्यावरुन गायब झाल्यास पुणेकरांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे.

कंत्राटदारांच्या पत्रात नेमकं काय?

25 तारखेपर्यंत लागणारी त्यांची देय रक्कम न मिळाल्यास त्यांना ऑपरेटर कंपन्यांना बस उभ्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असं या पत्रात नमदू करण्यात आलंय. PMPML च्या बसेस चालवण्यासाठीच्या कंत्राटात व्यवहार्यता तफावत निधी (तोटा) PMC आणि PCMC द्वारे अनुक्रमे 60 टक्के आणि 40 टक्केच्या प्रमाणात भरणे अशा पध्दतीचा करार आहे. PMPML अंतर्गत अन्थनी, हंसा, ट्रॅव्हल टाईम, BVG इत्यादी 6 ते 7 कंपन्यांद्वारे प्रती किमी योजनेअंतर्गत पुण्यात सुमारे 1 हजार बसेस सध्या कार्यरत आहेत. याच कंपन्यांची देय रक्कम थकली आहे.

कंत्राटदार कंपन्या आर्थिक अडचणीत

>> कंपन्याकडून बसेस खरेदी केल्या जातात

>> EMI, चालकाचे वेतन आणि देखभाल इत्यादी खर्च ऑपरेटर कंपन्याचा असतो

>> वेगवेगळ्या मार्गावर PMPMLच्या निर्देशानुसार या बसेस चालतात

>> जवळ जवळ सर्व ऑपरेटर कंपन्यांची देयके मागील सहा महिन्यांच्या ऑपरेशनसाठी दिलेली नाहीत

>> सप्टेंबर 2021 पासून बिलं प्रलंबित आहेत, त्यामुळे कंपन्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

PMPML, महापालिका काय तोडगा काढणार?

हा व्यवसाय बराच जास्त भांडवल केंद्रित आहे. त्यामुळे कोट्यवधीची थकबाकी ऑपरेटर्ससाठी खुप त्रासदायक ठरतेय. ऑपरेटर आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याने त्यांनी PMPML ला सेवा चालू ठेवण्याची पत राहिली नसल्याचं सांगत एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटल्याप्रमाणे 25 मार्च 2022 पूर्वी त्यांचे थकीत बील न मिळाल्यास आर्थिकदृष्ट्या बस चालवण्याच्या परिस्थीत ते राहणार नाहीत. या 1 हजार बसेस जर चालायच्या थांबल्या तर पुणेकरांची मोठी गैरसोय होणार आहे. अशावेळी PMPML आणि महापालिका यावर काय तोडगा काढते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या :

वडगाव शेरीमधील पीडित मुलीला महिला आयोग मदत करणार; हल्ला करणाऱ्यानेही विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

VIDEO | उठाले रे बाबा! नो पार्किंगमधील स्कूटर सामानासकट उचलली, स्थळ आपलं नेहमीचंच-पुणे!