मराठी माणसाला नकार पण मीरा-भाईंदरमध्ये परप्रांतीयांच्या मोर्चाला परवानगी कशी? भाजप आमदार नरेंद्र मेहता म्हणाले…

Mira Bhayandar मध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. पोलिसांकडून मनसैनिकांवर कारवाई सुरु आहे. पण याचं मीरा-भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला होता. त्याला परवानगी कशी मिळालेली? या बद्दल जाणून घेऊया.

मराठी माणसाला नकार पण मीरा-भाईंदरमध्ये परप्रांतीयांच्या मोर्चाला परवानगी कशी? भाजप आमदार नरेंद्र मेहता म्हणाले…
Narendra Mehta
| Updated on: Jul 08, 2025 | 12:37 PM

मीरा-भाईंदरमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. त्यावरुन मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. मनसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांकडून मनसैनिकांच अटक सत्र सुरु आहे. यावर मीरा-भाईंदरचे स्थानिक भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी भाष्य केलं आहे. “लोकशाही देश आहे. मोर्चा काढणं चुकीच नाही. पण मोर्चाच्या नावाखाली हेतू वेगळा असेल तर पोलिसांना गोपनीय विभागाच्या माध्यमातून कळतं. पोलिसांना आतापर्यंत काय कारवाई केलीय, त्याबद्दल माझ्याकडे माहिती नाहीय” असं नरेंद्र मेहता म्हणाले.

“कायदा-सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. ते काम त्यांनी योग्य पद्धतीने केलं असेल. कोणाच्याही मोर्च्या काढण्याला बंदी नसावी. पण हेतू वेगळा आहे. मराठी एकीकरण समितीच्या नावाने मोर्चाला तूल दिल जातय. पूर्व मनसेचा कार्यकर्ता मराठी एकीकरण समितीचा अध्यक्ष आहे” असा दावा नरेंद्र मेहता यांनी केला.

‘हिंदू पक्षाला, हिंदू उमेदवाराला मदत केली नाही’

“याच मराठी एकीकरण समितीने विधानसभेला कुठल्याही हिंदू पक्षाला, हिंदू उमेदवाराला मदत केली नाही. एका मुस्लिम उमेदवाराला मदत केली. ही मराठी एकीकरण समितीची कुठली भूमिका? या मोर्चामागे काँग्रेस, उबाठा आहे” असा आरोप नरेंद्र मेहता यांनी केला. “कायदा-सुव्यस्था बिघडता कामा नये, म्हणून पोलिसांनी कदाचित कारवाई केली असावी. मोर्चा काढणं चुकीचं नाही. पोलिसांकडे गोपनीय रिपोर्ट असतो. त्या मोर्चाच्या मागचा उद्देश काय आहे? म्हणून पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई केली असावी” असं नरेंद्र मेहता म्हणाले.

मराठी लोकांवर संशय घेताय का?

“माझ्या माहितीप्रमाणे व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी दिली नव्हती. त्यांचा स्पष्ट हेतू होता, आमच्या लोकांना मारलं, भविष्यात अशा घटना घडू नयेत, कारवाई करावी अशी मागणी होती. ते हॉलेमध्ये संघटित झालेले. काहीजण अतिउत्साहात दुकानात गेले. पण त्यांची भूमिका स्पष्ट होती” असं नरेंद्र मेहता म्हणाले. मराठी लोकांवर संशय घेताय का? या पत्रकाराच्या प्रश्नावर नरेंद्र मेहता म्हणाले की, “मोर्चा काढणं चुकीचं नाही. पण मोर्चामागे हेतू वेगळा असेल तर पोलिसांनी दखल घेतली पाहिजे”