AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Gambhir Case: गौतम गंभीरने 2.5 कोटी रूपयांची मागितली नुकसान भरपाई, झालं असं की…

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहे. असं असताना गौतम गंभीर वैयक्तिक आयुष्यात मात्र वेगळ्याच कारणाने व्यथित आहे. असं असताना त्याने नुकसान भरपाई म्हणून अडीच कोटींचा दावा ठोकला आहे.

Gautam Gambhir Case: गौतम गंभीरने 2.5 कोटी रूपयांची मागितली नुकसान भरपाई, झालं असं की...
Gautam Gambhir Case: गौतम गंभीरने 2.5 कोटी रूपयांची मागितली नुकसान भरपाई, झालं असं की...Image Credit source: PTI
| Updated on: Mar 19, 2026 | 5:21 PM
Share

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कायम वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो. त्याची रोखठोक विधानांमुळे चर्चेचं कारण ठरतं. पण प्रत्येक वेळी त्याने तशी विधानं केलीच असं नाही. म्हणजेच त्याच्या विरोधात पसरवल्या जाणाऱ्या बातम्याही खोट्या असतात. त्यामुळे गेल्या वर्षात गौतम गंभीर प्रचंड नाराज झाला आहे. आपल्या नावावर काहीही खपवलं जात असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे त्याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपलं नाव आणि ओळखीचा गैरवापर केला जात असल्याचं त्याचं म्हणणं आहे. तसेच त्या माध्यमातून खोट्या गोष्टी जाणीवपूर्वक पेरल्या जात आहे. गौतम गंभीरने यासाठी दिल्ली न्यायालयाचं दार ठोठावलं असून 16 इन्स्टाग्राम खाती आणि अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे. हा खटला दिल्ली उच्च न्यायालयाच्या कमर्शियल डिव्हिजनमध्ये दाखल केला असून 2.5 कोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

गौतम गंभीरला त्रास होण्याचं कारण की…

गौतम गंभीरने आपल्या तक्रारीत स्पष्ट म्हंटलं आहे की, 2025 च्या शेवटची त्यांच्या नावाने युट्यूब, एक्स, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर काही खोटे कंटेट क्रिएट केले गेला. यात एआय, फेस स्वॅपिंग आणि व्हॉइस क्लोनिंग केल्याचा आरोप केला. या माध्यमातून खोटे व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओत केलेली विधान पाहून गौतम गंभीरलाच धक्का बसला. कारण त्याने ही विधानं यापूर्वी कधीच केली नव्हती. इतकंच काय तर त्याच्या नावाने राजीनामा दिल्याचा एक खोटी पोस्टही गेली होती. त्याला 29 लाख व्ह्यूज मिळाले होते. इतकंच काय तर एका व्हिडीओ क्लिपमध्ये तर वरिष्ठ खेळाडूंबाबत काहीही बोलताना दाखवलं गेलं आहे. त्यामुळे गौतम गंभीर या खोट्या कंटेटमुळे त्रस्त झाला आहे.

गंभीरने या इन्स्टाग्राम खात्यांवर ठोकला दावा

गौतम गंभीरने फेक व्हिडीओ कंटेटबाबतकाही सोशल मिडिया खात्यांवर खटला दाखल केला आहे. यात JanKey Frames, Bhupendra Paintola, Legends Revolution, gustakhedits, cricket_memer45, GemsOfCrickets, Crickaiith, Sunny Upadhyay, @imRavY_ या खात्यांची नावं आहेत. गौतम गंभीरने आपल्या तक्रारीत स्पष्ट म्हंटलं आहे की, त्याची ओळख, नाव, चेहरा आणि आवाजाच्या गैरवापर करून अज्ञान खात्यांनी चुकीची माहिती पसरवली आणि त्यातून पैसे कमावले. त्यामुळेच खटला दाखल करावा लागला. गौतम गंभीरने खटला दाखल करताना 2.5 कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे. इतकंच काय तर सोशल मीडियावर खोटे व्हिडीओ डिलिट करण्यास सांगितलं आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात