मोठी बातमी! मुंबईतून आठ तृतीयपंथींना अटक; ओळख पटताच उडाली खळबळ

मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे, या बातमीनं खळबळ उडाली आहे. मुंबईमधून आठ तृतीयपंथी लोकांना अटक करण्यात आली आली आहे.

मोठी बातमी! मुंबईतून आठ तृतीयपंथींना अटक; ओळख पटताच उडाली खळबळ
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 27, 2025 | 8:20 PM

मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे, या बातमीनं खळबळ उडाली आहे. मुंबईमधून आठ तृतीयपंथी लोकांना अटक करण्यात आली आली आहे. मात्र त्यांची ओळख पटताच पोलिसांना देखील मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी ज्या आठ तृतियपंथी लोकांना अटक केली आहे, ते सर्व बाग्लादेशी नागरिक आहेत. आपली ओळख गुप्त राहावी, आपण पकडले जाऊ नये म्हणून ते मुंबईमध्ये लिंग बदलून राहत होते. मात्र पोलिसांनी अखेर त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हे तृतीयपंथी लोक भारतामध्ये वास्तव्याला होतो. मुंबई पोलिसांकडून शहरात राहणाऱ्या बाग्लादेशी नागरिकांचा शोध सुरू आहे. याचदरम्यान ही मोठी कारवाई करण्यात आली आहे, मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. मुंबईमधून आठ तृतीयपंथी नागरिकांना अटक करण्यात आलं आहे. त्यांची ओळख पटताच पोलिसांना देखील धक्का बसला आहे.  ते सर्व बांगलादेशी नागरिक असल्याचं समोर आलं आहे. आपली ओळख गुप्त राहावी, आपण पोलिसांच्या नजरेस पडू नये, यासाठी ते तृतीयपंथी बनून शहरात राहात होते. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या नागरिकांना रफिक नगरमधून अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं 

1) बैसाखी एमडी शहाबुद्दीन खान, वय-24 वर्ष ,मुळगाव: मोहजर कॉलनी नंदीपाडा, बाशाबो झोन सहा ढाका, देश -बांगलादेश.
2) मो. रिदोय मिया पाखी, वय-25, मुळगाव: बाश हटी ठाणा ईश्वर गंज जिल्हा किशोर गंज, देश- बांगलादेश.
3) मारूफ इकबाल ढाली , वय-18 मुळगाव :रूपगंज नारायण गंज ढांका देश- बांगलादेश
4) शांताकांत ओहीत खान वय 20वर्ष मुळगाव : इब्राहिमपूर कमरुल ढांका देश- बांगलादेश
5) बर्षा कोबीर खान वय 22 वर्ष , मुळगाव : शिवगंज डाकघर मुरपारा, ठाणा रूपगंज जिल्हा- नारायणगंज देश- बांगलादेश
6) मो. अफजल मोजनूर हुसेन वय 22 वर्ष मुळगाव: गोपीनाथपूर गुजा दिया, ठाणा करीमगंज जिल्हा किशोरगंज देश- बांगलादेश
7) मिझानुर इब्राहिम कोलील वय 21 वर्ष मुळगाव : बटवार गोप सुंदर ठाणा करीमगंज जिल्हा- किशोरगंज देश- बांगलादेश
8) शहादत आमिर खान वय 20 वर्ष ,मुळगाव : भुलता गावसिया ठाणा रूपगंज जिल्हा- नारायण गंज देश ,बांगलादेश ( सध्या सर्व राहणार : शिवाजीनगर)