AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला डॉक्टर दोघांचाही संपर्कात, मृत्यूच्या रात्रीही… पोलिस तपासात धक्कादायक खुलासे, थेट..

Satara Doctor Case : साताऱ्याच्या फलटण शहरातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ उडालीये. पोलिसांकडून या प्रकरणावर भाष्य केले जातंय. चक्क एक पीएसआय या प्रकरणात आरोपी आहे.

महिला डॉक्टर दोघांचाही संपर्कात, मृत्यूच्या रात्रीही... पोलिस तपासात धक्कादायक खुलासे, थेट..
Satara Doctor Case Police
| Edited By: | Updated on: Dec 18, 2025 | 11:24 PM
Share

सातारा फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली. ही महिला अधिकारी मागील काही वर्षांपासून फलटणच्या शासकीय रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होती. विशेष म्हणजे कामात अत्यंत मेहनती असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने विविध चर्चा रंगताना दिसत आहे. आत्महत्येपूर्वी तिच्या मनात खूप काही सुरू होते. फलटण शहरात भाड्याने घर असताना देखील त्यांनी हॉटेल दोन दिवसांसाठी बुक केले आणि तिथेच आत्महत्या केली. आत्महत्येच्या पूर्वी त्यांनी आपल्या तळहातावर एक नोट लिहित चक्क फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचा आरोपी पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे लिहून गंभीर आरोप केली.

पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला असून ही आत्महत्या नव्हे तर हत्या असल्याचा आरोप काहींनी केला. महिला अधिकाऱ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा गुंता वाढला असल्याचे नुकताच पोलीस अधीक्षकांनी म्हटले. तिने रात्री दीड वाजता आत्महत्या केल्याचे शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले. मात्र, आत्महत्या करण्याच्या अगोदर ती या दोन्ही आरोपींच्या संपर्कात होती, अशी माहिती पुढे आली आहे.

पीडितेचे दोन्ही आरोपींसोबत असलेले संबंध, संवाद आणि मोबाईल चॅटिंगमुळे गुंता अधिक वाढला. हेच नाही तर पीडितेने हॉटेल बुक केल्याने अधिक गुंता वाढलाय. पोलिसांकडून सध्या प्रत्येक अॅंगलने तपास केला जात आहे. तपासात ही देखील माहिती मिळाली आहे की, पीडिता  आत्महत्येच्या काही तास अगोदर दोन्ही आरोपींच्या संपर्कात होत्या. त्या चॅटिंग करत होत्या.

या महिलेचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात असून आता त्यासंदर्भातील तपास केला जात आहे. इतर आरोपींची मोबाईल पोलिस ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या तिघांमध्ये नेमके काय सुरू होते, त्या रात्री हे फक्त आणि फक्त मोबाईलमधील चॅटिंग आणि इतर गोष्टींमुळे स्पष्ट होऊ शकते. दोन्ही आरोपींनी मान्य केले आहे की, ते महिला डॉक्टरच्या संपर्कात होते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...