AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hingoli Crime News : ड्युटीला जातो म्हणाला अन् दुसरं लग्न केलं; पहिल्या पत्नीने जाब विचारताच लग्नमंडपात राडा

वसमतमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याने पहिली पत्नी हयात असताना, तिला घटस्फोट न देताच दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या पत्नीने विरोध केल्यावर, पतीने तिला भर मंडपात अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होऊन प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. आरोपी प्रशांत गजभारेवर वसमत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदेशीर कारवाई सुरू आहे, ज्यामुळे कायद्याच्या रक्षकाचे कृत्य सर्वांनाच धक्कादायक वाटत आहे.

Hingoli Crime News : ड्युटीला जातो म्हणाला अन् दुसरं लग्न केलं; पहिल्या पत्नीने जाब विचारताच लग्नमंडपात राडा
दुसऱ्या लग्नाबद्दल जाब विचारताच पहिल्या पत्नीला मारहाण
| Updated on: Jul 09, 2026 | 1:26 PM
Share

पोलीस हे कायद्याचे रक्षक असतात, असच आपण सर्वांनी आजपर्यत ऐकलंय, पण याच रक्षकांनी कायदा तोडायचं ठरवलं तर..? कायदा पाळण्याची, रक्षणाची जबाबदारी असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यानेच कायदा पायदळी तुडवल्याचा अत्यंत संतपाजनक आणि तितकाच धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पहिली पत्नी हयात असताना, आणि तिच्याशी घटस्फोट झालेला नसतानाही, हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात एका पोलीसाने दुसरं लग्न करण्याचा घाट घातल्याचं उघड झालं आहे. एवढंच नव्हे नवऱ्याच्या होणाऱ्या लग्नाबाबत समजल्यावर त्याची पत्नी त्याला थांबवण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी आली तेव्हा. याच पोलीसाने तिला सर्वांसमोर अमानुष मारहाण केली. या भयानक घटनेचे काही क्षण व्हिडीओत कैद झाले असून त्यामध्यो तो पोलीस कर्मचारी पत्नीला बेदम मारताना दिसतोय, मात्र तिथे उभ्या असलेल्या लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यामुळे संतापाची प्रचंड लाट उसळली असून वसमत शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत गजभारे असे आरोपी पतीचं नाव असून तो नांदेड पोलीस दलात कार्यरत असल्याचा दावा पहिल्या पत्नीने केला. पत्नीच्या म्हणण्यानुसार, प्रशांत गजभारे यांनी घरी “ड्युटीवर जात आहे” असे सांगितलं आणि त्यानंतर थेट दुसरं लग्न केलं.

वसमत शहरातील कृष्णा मंगल कार्यालय परिसरात हा प्रकार घडला. पतीचे दुसरे लग्न सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पहिली पत्नी तेथे पोहोचली. आपला घटस्फोट वगैरे काहीही झालेला नाही, तरी तू दुसरं लग्न का करतो असा जाब तिने पतीला विचारला. मात्र ते ऐकून तिचा पती, पोलीस कर्मचारी प्रशात भडकला आणि त्याने आजूबाजूची लोक, परिस्थिती काहीच न बघता पत्नीला मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच नवरदेव पती प्रशांतसह काही नातेवाईकांनी आपल्याला मारहाण केला, असा आरोप महिलेने केला आहे.

या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत. प्रकरणाची चौकशी वसमत शहर पोलीस करत असून, संबंधित आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ