मुंबईमध्ये आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड, दमानियांनाही ताब्यात घेतलं, अमित ठाकरेंना अडवलं, मोठा गोंधळ

मुंबई पुण्यामध्ये आता सीजेपी आंदोलकांची धरपकड सुरु आहे. शिवाजी पार्कात जाण्यासाठी अमित ठाकरेंनाही अडवण्यात आलं आहे. अंजली दमानियांना पोलिसांनी उचललं आहे. त्यामुळे आता सीजेपीच्या आंदोलनापूर्वी पोलिस कडक भूमिका घेताना दिसत आहेत.

मुंबईमध्ये आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड, दमानियांनाही ताब्यात घेतलं, अमित ठाकरेंना अडवलं, मोठा गोंधळ
CJP Protest Mumbai
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 11, 2026 | 5:54 PM

कालच्या दिल्लीमधील सीजेपीच्या आंदोलनानंतर आज मुंबईमध्येही सीजेपीने आंदोलनाची हाक दिली आहे.  शिवाजी पार्कमध्ये हे आंदोलन प्रस्तावित आहे. रात्र होत असल्याने याठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती. कार्यकर्ते मोठी गर्दी करत होते. त्यामुळे पोलिसांनी याठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड करायली सुरुवात केली. विषेश म्हणजे याठिकाणी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे सध्या शिवाजी पार्क परिसरात गोंधळाचं वातावर झालेलं पाहायला मिळते आहे. शकडो कार्यकर्त्यांची धरपकड सुरु असून आंदोलकांकडून घोषणाबाजी सुरु आहे. आंदोलकांना ताब्यात घेत पोलीस व्हॅन मधून आंदोलकांना नेण्यात आले.

शिवाजी पार्क परिसरातील सर्व रस्ते पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे. संपूर्ण परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. प्रत्येकाची पोलिसांकडून कसून विचारपूस सुरु आहे. संशयित आंदोलकांना आंदोलनापूर्वीच ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. रहिवाशांची वाहने तपासूनच परिसरात प्रवेश दिला जात आहे. दुपारी ४ वाजताच्या आंदोलनापूर्वी पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे. दरम्यान, यावेळी शिवाजी पार्कात जाणाऱ्या मनसे नेते अमित ठाकरेंनाही पोलिसांनी अडवलं.

Loading...

मुंबईतील दादर शिवाजी पार्कात पोलिसांचा जो प्रकार सुरु आहे तो निषेधार्ह आहे. आपण मुंबई पोलिस आहोत. दिल्ली पोलिस नाहीओत. आपल्यामध्ये फरक आहे. मी आजपर्यंत असं शिवाजी पार्क बघितलं नाही. चालता चालता मलाही पोलिसांनी अडवलं, असं त्यांनी म्हटलं आहे. शिवाजी पार्कात जे सुरु आहे. ते रोज चालणार नाही. आपण दिल्ली नाहीत. आपल्यात फरक, पोलिसांची इज्जत करतोय, पोलिसांनी दबावात येऊन काम करु नये, असं यावेळी अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

राजसाहेबांनी मुंबई महाराष्ट्राच्या पोलिसांचं नेहमी कौतुक केलं. पण आता असं वाटतंय की, पोलिस दबावात काम करत आहेत, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी महिलांवर हात उचलतात, हा काय प्रकार सुरु आहे, असं मनसेचे युवा नेते अमित ठाकरे म्हणाले आहेत.

दुसरीकडे आता याच पद्धतीने पुण्यातही पोलिसांकडून सीजेपी कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे. पुण्यातील गुडलक चौकात CJP कडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार त्यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. पण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या कथित मतचोरी प्रकरणावरुन त्यांचा राजीनामा मागितला जात आहे. त्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक आंदोलन करत असतानाच काल १० ऑक्टोबर रोजी सीजेपीने दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर सीजेपीचं आंदोलन यशस्वी होऊ नये यासाठी दिल्ली पोलिसांनी आणि केंद्र सरकारच्या राखीव पोलिसा तुकड्यांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. त्याच पार्श्वभूमिवर आता मुंबईतील दादर शिवाजी पार्कावरही मोठं आंदोलन उभा राहू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. त्या पार्श्वभूमिवर पोलिसांकडून सीजेपीच्या आंदोलकांची धरपकड केली जात आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us