AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणेंविरोधात तक्रार देणारे ते दोघे कोण? आक्षेप काय? वाचा सविस्तर

नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिक सचिन सावंत आणि राजू राठोड यांनी ही तक्रार दिली आहे. कारण राणे यांनी पत्रकार परिषदेत त्यांना नितेश राणे कुठे आहेत? असे विचारले असता, सांगायला मुर्ख आहे? असे विधान केले होते.

नारायण राणेंविरोधात तक्रार देणारे ते दोघे कोण? आक्षेप काय? वाचा सविस्तर
केंद्रीय मंत्री नारायण राणे
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 4:02 PM
Share

नितेश राणे यांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत, त्यावरून त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही नोटीस बजावली आहे. दोन शिवसैनिकांनी पोलिसात नारायण राणे यांच्याविरोधात लेखी तक्रार करणारे पत्र पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी राणे यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे हा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि राणे आमनेसामने आले आहेत, हा सत्तेचा अहंकार असल्याची टीका भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे, तर पोलीस त्यांचे काम करत आहेत, त्यात सरकारचा कसलाही हस्तक्षेप नाही, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीतील नेते देत आहेत.

सचिन सावंत, राजू राठोड या शिवसैनिकांची तक्रार

राणेंना नोटीस बजावल्यानंतर राणेंविरोधात तक्रार देणारे हे शिवसैनिक कोण आहेत? आणि त्यांचा काय आक्षेप आहे? याची चर्चा सुरू झाली. नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिक सचिन सावंत आणि राजू राठोड यांनी ही तक्रार दिली आहे. कारण राणे यांनी पत्रकार परिषदेत त्यांना नितेश राणे कुठे आहेत? असे विचारले असता, सांगायला मुर्ख आहे? असे विधान केले होते. त्यामुळे राणेंच्या बोलण्यातून त्यांना माहीत आहे की, नितेश राणे कुठे आहेत, त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या शिवसैनिकांनी पोलिसांना पत्र लिहून केली आहे. पोलिसांनी आम्हाला सांगितले की, आमची चौकशी सुरू आहे, त्याबाबत फिर्याद द्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया या शिवसैनिकांनी दिली आहे.

राणे प्रकरणावरून राजकारण तापले

नारायण राणे यांना माहिती आहे की, नितेश राणे कुठे आहेत? त्यामुळे एक केंद्रातील मंत्रीच नितेश राणेंना पाठिशी घालत आहेत, त्यामुळे शिवसैनिकांनी यावर आक्षेप घेतला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. तर महाविकास आघाडी सरकारचा हा सत्तेचा अहंकार आहे, हा अहंकारच सरकार बुडवेल अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे. मात्र कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचले हे त्यांचे दुर्दैव आहे, आजही कायदा सक्षम आहे हे भारतमातेचे सुदैव असेही विनायक राऊत म्हणाले आहेत. नितेश राणेंचा शोध आणि नारायण राणे यांना नोटीस यावरून पुन्हा एकदा राज्यात जोरदार पॉलिटिकल राडा सुरू झाला आहे.

नारायण राणेंच्या बंगल्यावर पोलिसांची नोटीस, दहाच मिनिटात राणेंच्या कर्मचाऱ्याने नोटीस काढली?

Narayan Rane vs Shiv Sena LIVE : नितेश राणेंचा शोध सुरू, नारायण राणेंना पोलिसांची नोटीस, सर्वात वेगवान अपडेट

Positive News | आवक वाढूनही सोयाबीनचे दर स्थिरावले, तरीही शेतकऱ्यांनी…

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.