मोठी बातमी! राजकारणात मोठा भूकंप; भजप, शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार, भाजपकडून ठाकरेंना मोठी ऑफर?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, भाजप आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता असून, भाजपकडून शिवसेना ठाकरे गटाला मोठी ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मोठी बातमी! राजकारणात मोठा भूकंप; भजप, शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार, भाजपकडून ठाकरेंना मोठी ऑफर?
भाजपकडून शिवसेना ठाकरे गटाला मोठी ऑफर?
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 08, 2026 | 4:43 PM

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, सर्वात आधी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, त्यानंतर राज्यात महापालिकांच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये देखील भाजपच हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान शनिवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं आहे. उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची मतमोजणी आहे, त्यापूर्वी राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. भाजपकडून शिवसेना ठाकरे गटाला मोठी ऑफर देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महापालिका निवडणुकांमध्ये भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत युती केली होती. भाजप जरी या निवडणुकांमध्ये मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अनेक ठिकाणी भाजपला आपला महापौर बसवण्यासाठी मित्र पक्षांच्या पाठिंब्यांची गरज लागत आहे, जिथे मित्र पक्षांच्या जागा कमी आहेत, तिथे इतरही पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचं पहायला मिळत आहे, आता चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रपूरमध्ये भाजपनं शिवसेना ठाकरे गटाला मोठी ऑफर दिली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला सव्वा वर्ष महापौरपद तसेच पाच पैकी दोन वर्ष स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि उपमहापौरपदाची ऑफर भाजपकडून देण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजपकडून शिवसेना ठाकरे गटाला सव्वा वर्ष महापौरपदाची ऑफर देण्यात आली आहे, मात्र पहिले सव्वा वर्ष कोणाचा महापौर होणार? यावर आता शिवसेना ठाकरे गटात चर्चा सुरू झाली आहे. तर पहिले सव्वा वर्ष हा भाजपचा महापौर असेल अशी मागणी भाजपची आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.  जर शिवसेनेला हा फॉर्म्यूला मान्य नसेल तर मात्र भाजप विरोधी पक्षात बसणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.