Thane Crime : पूर्णेकर प्रकरणाच्या तपासात मोठा ट्विस्ट, पप्या शिंदेच्या… पोलिसांना मिळाली महत्त्वाची लीड

प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेला महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी पप्या शिंदे याची गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. ज्या ठिकाणी पूर्णेकर यांची हत्या झाली, त्यापासून अवघ्या १० मीटर अंतरावर ही गाडी गेल्या ३ दिवसांपासून उभी असल्याचं समोर आलं आहे.

Thane Crime : पूर्णेकर प्रकरणाच्या तपासात मोठा ट्विस्ट, पप्या शिंदेच्या... पोलिसांना मिळाली महत्त्वाची लीड
Pradeep Purnekar case
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 02, 2026 | 9:56 PM

गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाची लीड लागली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी पप्या शिंदे याची कार ठाणे गुन्हे शाखेने जप्त केली आहे. ज्या ठिकाणी पूर्णेकर यांची हत्या झाली, त्यापासून अवघ्या 10 मीटर अंतरावर ही कार मागील 3 दिवसांपासून उभी होती. विशेष म्हणजे, कारची चावीही त्याच ठिकाणी फेकलेली आढळून आली.

पप्या शिंदे याच्या चौकशीतून कारबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता घटनास्थळाच्या बाजूलाच ही कार आढळून आली. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून कार जप्त केली आहे.

Loading...

पप्या शिंदे याच कारमधून प्रदीप पूर्णेकर यांना भेटण्यासाठी आला होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनीही ही कार ओळखल्याची माहिती आहे. त्यामुळे हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना या कारच्या माध्यमातून महत्त्वाचा धागा मिळाल्याचे सांगितले जात आहे.

मंत्री नाईकांंनी घेतली भेट

दरम्यान, ठाण्यात आज प्रदीप पुर्णेकरांच्या कुटुंबियांची मंत्री गणेश नाईक भेट घेतली. एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या मिनाक्षी शिंदेवर आणि पुर्णेकर यांच्यावर कुटुंबीयांचे गंभीर आरोप आहेत. त्यापार्श्वभूमिवर ही भेट होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिदें यांच्या विरोधात गणेश नाईक विरोधाची भूमिका घेत असतात. “पुर्णेकर कुठल्या पक्षा होता यापेक्षा एक सामाजिक कार्यकर्ता होता. ज्या गोष्टी समोर येतात त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. बरेचं अटक झालेले आहेत. गृहमंत्र्यांनी कुठल्याही प्रकारे कसूर तपासात न ठेवता करावा असं त्यांनी यावेळी सांगितलं.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून कार्यालयाची तपासणी

दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी आणि त्यांच्या पथकाने प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या झालेल्या कार्यालयाची तपासणी केली. पूर्णेकर कुटुंबीयांचे काही महत्त्वाचे दस्तावेज या कार्यालयात होते. हे दस्तावेज कुटुंबीयांना हवे असल्याने कार्यालय उघडण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली आहे.

या तपासणीदरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने कार्यालयातील परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, पप्या शिंदे यांच्या कारचा तपासात लागलेला हा धागा हत्या प्रकरणाच्या पुढील तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us