शरद पवारांसोबत रुग्णालयात नेमकी काय चर्चा झाली? प्रफुल पटेल यांच्याकडून मोठा खुलासा, सगळं सांगून टाकलं

शरद पवारांसोबत रुग्णालयात नेमकी काय चर्चा झाली? याविषयी प्रफुल पटेल यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी यावेळी मोठं भाष्य केलं.

शरद पवारांसोबत रुग्णालयात नेमकी काय चर्चा झाली? प्रफुल पटेल यांच्याकडून मोठा खुलासा, सगळं सांगून टाकलं
sharad pawar and praful patel
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 08, 2026 | 2:40 PM

शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आलं होतं. शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रफुल पटेल हे भेटीसाठी पोहोचले होते. काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दोन्ही नेत्यांची चर्चा झाली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. दोन्ही नेत्यांमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बोलणं झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांना साथ देणाऱ्या प्रफुल पटेल यांनी अमित शहा यांच्यानंतर शरद पवारांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या भेटीवर प्रफुल पटेल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.

प्रफुल पटेल आणि शरद पवार यांच्याासोबतचा भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दोन्ही नेते बराच वेळ चर्चा करताना दिसले. या व्हिडिओमध्ये 10 तारखेला भेटणार असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या दहा तारखेच्या भेटीत नेमकी विलीनीकरणाची चर्चा होणार का, यावरून तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बोलणं झाल्याची चर्चा फेटाळून लावली.

Loading...

प्रफुल पटेल म्हणले, शरद पवार हे रुग्णालयात दाखल होते. स्वाभाविक आहे, मला वर्षानुवर्षे शरद पवार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे आशीर्वाद नेहमीच लाभले. त्यांच्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो. खूप चांगल्या वातावरणात भेट झाली. ईश्वराची कृपा असावी की, त्यांची तब्येत बरी झाली. आता ते  घरी गेले आहेत. स्वाभाविक आहे की, भेटल्यानंतर थोडीफार चर्चा होते. पण चर्चा काही विशेष नव्हती. नक्कीच साहेब घरी आले आहेत. दिवाळीतील गोंदियाच्या प्रवासानंतर मुंबईला जाईल. तेव्हा भेटण्याचा प्रयत्न करेल. ते आणि मी 10 तारखेविषयी बोलत होतो. 8 आणि 9 तारखेला म्हणजे दिवाळीत गोंदियात असतो. त्यांनाही माहीत आहे. मी 10 तारखेनंतर मुंबईत येतो. हॉस्पिटलमध्ये फार काही चर्चा करता येत नाही. तिथे चर्चा योग्य नव्हती. हॉस्पिटलमध्ये आम्ही विलीनीकरणाची चर्चा करणार आहोत का? पण नक्कीच पवार साहेबांप्रति आमचा आदर आहे. होता आणि सदैव राहणार आहे.त्यामुळे पवार साहेबांची प्रकृती चांगली राहावी. ही सगळ्यांची इच्छा आहे आणि राहणार आहे. मी एवढंच म्हटलं की, 10 तारखेला मुंबईत आल्यावर चर्चा करू. ही चर्चा राजकीयच असेल, असं काही नाही’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us