BIG BREAKING | आमदार बच्चू कडू यांना मोठा झटका, कलम 506 अंतर्गत दोषी, अडचणी वाढणार?

| Updated on: Feb 27, 2023 | 6:29 PM

धाराशिवमधून (उस्मानाबाद) एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आलीय.

BIG BREAKING | आमदार बच्चू कडू यांना मोठा झटका, कलम 506 अंतर्गत दोषी, अडचणी वाढणार?
बच्चू कडू
Follow us on

धाराशिव : धाराशिवमधून (उस्मानाबाद) एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आलीय. बच्चू कडू यांना कलम 506 अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं आहे. पोलिसांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या कलमाअंतर्गत ते दोषी आढळले आहेत. याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी आदेश दिला आहे. या प्रकरणात वकील महेंद्र देशमुख यांनी सरकारची बाजू मांडली.

धाराशिव जिल्हा परिषदेत 2 नोव्हेंबर 2015 मध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलना दरम्यान बच्चू कडू आणि अधिकारी यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. अपंग निधी अखर्चित राहिल्याने प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आंदोलन केले होते. यावेळी बच्चू कडू स्वतः हजर होते. त्यांनी आक्रमक आंदोलन केले होते.

या प्रकरणी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बचू कडू, प्रहारचे मयूर काकडे, बलराज रणदिवे, बाळासाहेब कसबे, चंद्रकांत जाधव हे 5 आरोपी होते. त्यातील इतर सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं आहे. शासकीय कामात अडथळा या गुन्ह्यांतून त्यांना निर्दोष ठरवण्यात आलंय. पण कलम 506 अंतर्गत त्यांना दोषी ठरवण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

कोर्टाकडून शिक्षा जाहीर

विशेष म्हणजे या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. मुख्य फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सतीश घंटे, डी वाय एस पी हिरे, आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांची साक्षी महत्वाची ठरली.

याप्रकरणी कोर्टाने शिक्षादेखील सुनावली आहे. कलम 506 नुसार कोर्ट उठेपर्यंत (कोर्टाचं कामकाज संपेपर्यंत) कोर्टात थांबण्याची शिक्षा आणि 2 हजार 500 रुपये दंड सुनावण्यात आलाय. याशिवाय पुढील काळात चांगले वर्तन केले जाईल, असं शपथपत्र पत्र देण्याचा आदेश कोर्टाने दिलाय.