AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं खळबळजनक सत्य समोर; भाजपात जाताच तनपुरेंचा मोठा गौप्यस्फोट, त्या बैठकीत काय घडलं?

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, असे सांगितले जात होते. त्यासाठी शरद पवार यांच्या पक्षातील सर्वच नेते अनुकूल होते. अजित पवार यांच्या पक्षातर्फे मात्र कोणत्याही नेत्याने तेव्हा प्रतिक्रिया दिली नव्हती.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं खळबळजनक सत्य समोर; भाजपात जाताच तनपुरेंचा मोठा गौप्यस्फोट, त्या बैठकीत काय घडलं?
prajakt tanpure and sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 30, 2026 | 7:31 PM
Share

NCP Merger : राज्यात दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या विलीनीकरणाची चर्चा तशी मागे पडली आहे. खुद्द खासदार शरद पवार यांनीच याबाबत संकेत दिलेले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंद यांनीही आता दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, असे सांगितलेले आहे. आता दोन्हीही राष्ट्रवादी पक्ष आपापल्या मार्गाने राजकारण करत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पक्ष सत्तेत आहे तर खासदार शरद पवार यांचा पक्ष विरोधी बाकावर आहे. दरम्यान, आता ही चर्चा मागे पडलेली असली तरीही नुकतेच भाजपात गेलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानानंतर आता पुन्हा एकदा विलीनीकरणाचा हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

प्राजक्त तनपुरे यांनी नेमकं काय सांगितलं?

विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर अहिल्यानगरातील नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकतेच भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही उपस्थिती होती. हा पक्षप्रवेश सोहळा पार पडल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना मी एका बैठकीला होता. या बैठकीत विलीनीकरणासंदर्भात चर्चा सुरू होत्या. त्या बैठकीला दिवंगत नेते अजित पवार हेदेखील होते. ही बैठक माजी मंत्री तथा आमदार जंयत पाटील यांच्या निवासस्थानी झाली होती, अशी माहिती तनपुरे यांनी दिले. तसेच त्या बैठकीला अजितदादा एकटेच होते, असेही तनपुरे म्हणाले.

विलीनीकरणाची चर्चा का केली जात होती?

दरम्यान, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, असे सांगितले जात होते. त्यासाठी शरद पवार यांच्या पक्षातील सर्वच नेते अनुकूल होते. अजित पवार यांच्या पक्षातर्फे मात्र कोणत्याही नेत्याने तेव्हा प्रतिक्रिया दिली नव्हती. काही दिवसांनी आमचा पक्ष सत्तेत आहे. विलीनकरण होणार म्हणजे कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात विलीनूकरण होणार? शरद पवार यांचा पक्ष सत्तेत सामील होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत खासदार तथा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी विलीनीकरण होणार नसल्याचे सांगून टाकले होते. त्यानंतर विलीनीकरणाची चर्चा हळूहळू विरून गेली.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता