शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष दाऊदचा; प्रकाश आंबेडकरांनी आरोप करत चीन-पाकिस्तानचं कनेक्शन सांगितलं

शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष दाऊदचाच आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांनी आरोप करत चीन-पाकिस्तानचं कनेक्शन सांगितलं.

शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष दाऊदचा; प्रकाश आंबेडकरांनी आरोप करत चीन-पाकिस्तानचं कनेक्शन सांगितलं
sharad pawar and prakash ambedkar
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 28, 2026 | 6:29 PM

डिलिमिटेशन विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शरद पवारांचा राष्ट्रवादीने तळ्यात मळ्यात भूमिका घेतल्याने सस्पेन्स वाढला आहे. काँग्रेस, ठाकरे गटाने उघडपणे डिलिमिटेशन विधेयकाचा विरोध केला आहे. परंतु पवारांच्या राष्ट्रवादीने भूमिका जाहीर न केल्याने मित्र पक्षाकडून जोरदार टीका केली जात आहे.  आता वंचित बहुजन आघाडीनेही शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा दाऊदचा आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली .

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी दुपारी ३ वाजता पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी डिलिमिटेशन विधेयकावरून महत्त्वाचे मुद्दे मांडत केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. डिलिमिटेशनच्या निमित्ताने देशात नवा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. आता विशेषतः उत्तर आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो, असा इशारा आंबेडकरांनी दिला.

Loading...

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एप्रिलमध्ये मांडण्यात आलेले डिलिमिटेशन विधेयक मंजूर झालं नाही. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा हे विधेयक मांडण्यात आलं. एप्रिलमध्ये विधेयकाचा पराभव होणे आणि नोव्हेंबरमध्ये ते पुन्हा मांडले जाणे. या दोन घटनांमधील घडामोडी भारतीय जनतेने समजून घेणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी हा दाऊद इब्राहिमचाच पक्ष आहे, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं.  या संदर्भात त्यांनी चीनच्या अरुणाचल प्रदेशमधील कथित अतिक्रमणाचा, अक्साई चीनवरील चीनच्या दाव्याचा आणि ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाचा मुद्दा उपस्थित केला.

चीनच्या बाजूने यारलुंग त्सांगपो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवर ६० गिगावॅट वीज निर्माण करणारे धरण उभारण्यात येणार आहे. ग्रेट बेंडच्या अगोदर पाणी अडवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे सेवन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्य भारतातील राज्यांवर दबाव निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. या राज्यांना पाणी हवे असेल तर चीनसोबत यावे, अन्यथा त्यांचा प्रदेश सुकवला जाईल, अशी परिस्थिती निर्माण केली जात असल्याचे ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us