प्रकाश आंबेडकरांकडून प्रधान यांच्या राजीनाम्याची चिरफाड; त्या दोन गोष्टींवर ठेवलं बोट
धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रकाश आंबेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी विद्यार्थी जे निर्णय घेतील, त्यांना पाठिंबा असेल, असेही त्यांनी सांगितले.

देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे ध्रमेंद्र प्रदान यांनी राजीनामा द्यावा लागला. 12 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा मोदी सरकारच्या कॅबिनेट पदावरील मंत्र्यांने राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर प्रकाश आंबेडकर यांनी पहिली प्रतक्रिया दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे. आंदोलनात समाजकंटक घुसतात, असं वक्तव्य राजीनाम्यात केलं आहे. त्यांनी 22 जणांनी आत्महत्या केली, याबद्दल त्यांनी कुठलीही खंत व्यक्त केलेली नाही. पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचारांचा राजीनाम्यात उल्लेख नाही. नुकसानभरपाई देणार, याबाबत कुठेही स्पष्टता यायला हवी होती’.
‘धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देऊन आगीत तेल टाकलं आहे. जे झुकणार नाही असं म्हणाले त्यांना आता नाक रगडवले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचा सरकारवर राग आहे, असं दिसतंय . आधी झुरळ हा शब्द म्हणून आणि नंतर लाठीचार्जचे व्हिडिओ केलेले आम्हाला बघायला वेळ नाही हे दोन वाक्य त्यांचे होते. नुकसानभरपाई आणि परीक्षेतील सुधारणा याबद्दल सरकार बोलायला तयार नाही, त्यामुळे माघार का घ्यावी. विद्यार्थी जे निर्णय घेतील, त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल, असे त्यांनी सांगितले.
राजीनाम्याआधी आंबेडकरांनी सरकारला दिला होता मोठा इशारा
केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याआधी प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला मोठा इशारा दिला होता. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं की, ‘काल कारवाई झाली, ती उशिरा झाली. कारवाईमध्ये काहीशी अशी परिस्थिती आहे. जंतरमंतर विध्यार्थी यांची मागणी आहे की, धर्मेंद्र प्रधान यांचा यांचा राजीनामा झाला पाहिजे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत.
धर्मेंद्र प्रधान यांना प्रतप्रंधान मोदी आणि अमित शहा काढू शकत नाही. येत्या आठवडा भरात राजीनामा झाला नाही, तर आम्ही लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत’.
‘अभिजीत दिपके यांना मी निरोप पाठवला आहे की, या आंदोलनाला राजकीय स्वरूप येऊ नये याची काळजी घ्यावी. शरद पवार यांना या आंदोलनापासून दूर ठेवा. शिक्षणमंत्र्यांनी सर्व लोकप्रतिनिधी यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी करावी. जो कुणी मागणी करणार नाही, त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार आहे. राजकीय पक्ष आणि आंदोलक यांनी आराखडा ठरवून आंदोलन करावं, असेही ते म्हणाले होते.