काढ काढ काढली आणि बिळात जाऊन बसला, आता लक्ष्मण हाकेचा देखील पगार चालू करतो, प्रसाद लाड कडाडले..

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली. आता या टीकेला प्रसाद लाड यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी खडेबोल लक्ष्मण हाके यांना सुनावले. त्यांना प्रसाद लाड कोण आहे हे माहिती नसल्याचे सांगतानाही ते दिसले.

काढ काढ काढली आणि बिळात जाऊन बसला, आता लक्ष्मण हाकेचा देखील पगार चालू करतो, प्रसाद लाड कडाडले..
Prasad Lad
| Updated on: Aug 07, 2026 | 1:58 PM

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठे विधान केले. त्यांनी थेट प्रसाद लाड यांच्या कानशिलात लगावणार असल्याचे म्हटले. ज्यानंतर खळबळ उडाली. आता लक्ष्मण हाके यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना प्रसाद लाड दिसले. प्रसाद लाड यांनी म्हटले की, प्रसाद लाड कोण आहे अजून त्यांना माहिती नाही. त्यांनी आधी गुगल सर्च करावे. एका वाक्यात मागतो.. हाती चले बाजार कुत्ते भोके हजार.. अशा लोकांना आम्ही भीक घालत नाही. असे अनेक आले आणि अनेक गेले. याच्यामागे चार लोक नाहीत. अमोल मिटकरीने काढ काढ काढली आणि नंतर बिळात जाऊन बसला. अशा लोकांवर न बोललेले चांगले. आपली संस्कृती अशी नाही. मी जे बोललो ते लक्ष्मण हाकेने ऐकले नाही. त्यावेळेस त्याचे कान बंद झाले असतील.
ओबीसी आरक्षण संदर्भात देखील एखादा संघर्ष करावा लागला तरी प्रसाद लाड भावासारखा उभा राहील असे मी बोललो.

पुढे प्रसाद लाड यांनी म्हटले की, लक्ष्मण हाकेला पाहिजे असेल तर त्याचाही पगार चालू करतो. एक लाख लोकांना मी नोकरी देतो. लक्ष्मण हाकेचा देखील पगार चालू करतो. त्यांनी मला शिकू नये. माझ्या कंपन्या स्टॉक एक्सचेंजला आहेत. आमच्यावर मॉनिटरिंगसाठी हजारो यंत्रणा आहेत. आधी स्वतःने वडापाव गाडी टाकून दाखवावी नंतर आम्हाला सांगावे.

जो साधा सरपंच नाही सदस्य नाही त्याने आमदार एक वेळेस राज्यमंत्री सात वेळा मंत्री झालेल्या माणसाला शिकवू नये. मनोज जरांगे यांच्या उपोषणाबद्दल बोलताना प्रसाद लाड यांनी म्हटले की, माझी आणि उदय सामंत आणि जरांगे पाटील यांची चर्चा सुरू आहे. त्यांच्या मागण्यांवर चर्चा आणि अभ्यास सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या आधी अधिवक्ता देखील काही कागदपत्रे पाठवून मार्गदर्शन मागितले.

मी देखील काही कागदपत्रे घेऊन अकरा बारा तारखेला तिथे चर्चेसाठी तिथे जाणार आहे.  निश्चितपणे मनोज जरांगे यांना उपोषण करायला लागणार नाही याचा प्रयत्न आमचा असेल. कारण मनोज जरांगे उपोषणाला बसले की त्यांचे बरोबर पाच पन्नास हजार मराठा समाजाचे लोक उपोषणाला बसतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us