AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे आमचे नेते, त्यांना जर कोणी बोलले तर… मंत्री प्रताप सरनाईक यांचे मोठे विधान

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. मात्र, यावेळी जरांगे यांनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ देत असल्याचे स्पष्ट केले. आता प्रताप सरनाईक यांनी मोठे विधान केले.

शिंदे आमचे नेते, त्यांना जर कोणी बोलले तर... मंत्री प्रताप सरनाईक यांचे मोठे विधान
Pratap Sarnaik
| Updated on: Sep 17, 2026 | 6:10 PM
Share

मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे विधान केले. प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, शिंदे आमचे नेते, त्यांना कोणीही बोलले तर आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार, जरांगे पाटलांवरील संभ्रम दूर करण्यासाठी मराठा बांधवांशी चर्चा केली असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. त्यांनी पुढे म्हटले की, मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आम्ही कोणताही अपशब्द वापरला नाही, तेही आमचे समाजबांधव आहेत. तीन महिन्यांच्या कालावधीत जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकार निश्चितपणे विचार करेल. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत टंचाई आराखडा तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. DPDC बैठकीला गैरहजर राहिलेल्या आमदारांवर सरनाईक नाराज झाले आहेत. त्यांनी म्हटले की, एवढ्या महत्त्वाच्या बैठकीला आमदारांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे, तानाजी सावंत यांच्यासह इतर चार आमदारांचेही सरनाईक यांनी कान टोचल्याचे बघायला मिळाले.

त्यांनी थेट या आमदारांवर नाराजी जाहीर केली. 17 सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांनाही सर्व लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहणे गरजेचे आहे, असेही मंत्री सरनाईक यांनी म्हटले. मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला पोहोचले होते.

यावेळी जरांगेंची समजूत काढण्यात आली. शेवटी जरांगे यांनी तीन महिन्याचा वेळ सरकारला दिला. यासोबतच हैद्राबाद गॅझेटबद्दलही जरांगे बोलताना दिसले. यावेळी मनोज जरांगे पाटील थेट एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका करताना दिसले. यापूर्वी त्यांनी कधीच शिंदेंवर टीका केली नव्हती. मात्र, यावेळीच्या आंदोलनापासून त्यांनी शिंदेंवरही टीका करण्यास सुरूवात केली.

एकनाथ शिंदे यांच्यावर जरांगे यांच्याकडून टीका केली जात असताना शिंदेंच्या मंत्र्यांनी जरांगे विरोधात भाष्य केले. हेच नाही तर ही टीका सहन केली जाणार नसल्याचेही त्यांनी म्हटले. जरांगेंना काहीतरी गैरसमज झाल्याचेही म्हणताना उदय सामंत दिसले होते. त्यातच प्रताप सरनाईक यांनीही भाष्य केले. जरांगे यांनी आता तीन महिन्यांचा वेळ सरकारला दिला आहे.

Follow Us
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली