AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND W vs JAP W: एशियन गेम्स स्पर्धेत भारताची पहिली लढत! जपानविरुद्ध अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन

IND W vs JAP W: एशियन गेम्स स्पर्धेत भारताची पहिली लढत जापानशी होणार आहे. या सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. जपानविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळेल? याबाबत क्रीडावर्तुळात चर्चा आहे. चला जाणून घेऊयात संभाव्य प्लेइंग 11

IND W vs JAP W: एशियन गेम्स स्पर्धेत भारताची पहिली लढत! जपानविरुद्ध अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
IND W vs JAP W: एशियन गेम्स स्पर्धेत भारताची पहिली लढत! जपानविरुद्ध अशी असू शकते प्लेइंग इलेव्हनImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Sep 17, 2026 | 6:03 PM
Share

एशियन गेम्स 2026 स्पर्धेमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ आपल्या सुवर्णपदकाच्या मोहिमेला 18 सप्टेंबर, शुक्रवारपासून सुरुवात करणार आहे. महिला क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या आणि अंतिम उपांत्यपूर्व सामन्यात भारताचा सामना नवख्या जपानविरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा बाद फेरीचा सामना अत्यंत महत्त्वाचा असून, भारताने हा सामना जिंकल्यास 20 सप्टेंबर रोजी उपांत्य फेरीत त्यांचा सामना बांगलादेशविरुद्ध होईल. असं असताना जापानविरुद्धच्या सामन्यात भारताची प्लेइंग 11 कशी असेल याची उत्सुकता आहे. नुकताच आशिया कप स्पर्धा पार पडली आहे. या स्पर्धेचं जेतेपद टीम इंडियाने जिंकलं आहे. मात्र आशिया जेतेपदासाठी उतरलेल्या प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्याला कारणही तसंच आहे. एशियन गेम्स स्पर्धेत दोन बदल होण्याची शक्यता आहे.

श्रेयंका पाटील करणार पुनरागमन

दुखापतीमुळे महिला आशिया कप 2026 ला मुकलेली स्टार अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटील आता पूर्णपणे तंदुरुस्त झाली आहे. श्रेयंकाचे प्रशिक्षक अरुण देव यांनी एका मुलाखतीत ती फिट असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जपानविरुद्धच्या सामन्यात तिची प्लेइंग 11 मध्ये एन्ट्री निश्चित मानली जात आहे. श्रेयंका संघात प्रेमा रावतची जागा घेईल. आशिया कप खेळलेली प्रेमा रावत आता मुख्य संघातून बाहेर असून ती जपान दौऱ्यावर गेलेली नाही.

प्रतिका रावलचे पुनरागमन; कमालिनी बाहेर?

महिला आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध प्रतिका रावल खेळू शकली नव्हती आणि तिच्या जागी जी. कमालिनीला संधी देण्यात आली होती. मात्र, एशियन गेम्सच्या या पहिल्याच बाद फेरीच्या सामन्यात प्रतिका रावलचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जी. कमालिनीला प्लेइंग 11 मधून बाहेर जावे लागू शकते.

स्पिन आणि पेस बॅटरीमध्ये मोठे बदल

जपानविरुद्धच्या या सामन्यात भारताचे फिरकी आक्रमण अत्यंत मजबूत दिसत आहे. अनुभवी दीप्ति शर्मासोबत जगातील नंबर 1 गोलंदाज श्री चरणी आणि दुखापतीतून सावरलेली श्रेयंका पाटील स्पिन विभागाची धुरा सांभाळतील .दुसरीकडे, आशिया चषकात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या क्रांती गौड ऐवजी कर्णधार हरमनप्रीत कौर गोलंदाजीत मोठे बदल करू शकते. वेगवान गोलंदाजीत रेणुका ठाकूरसोबत नंदनी शर्माला मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग 11: शफाली वर्मा, स्मृती मंधाना, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋषा घोष (यष्टीरक्षक), भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, श्री चरणी, श्रेयंका पाटील, नंदनी शर्मा, रेणुका ठाकूर/क्रांती गौड.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप