साताऱ्याच्या पट्ठ्याची कमाल, UPSC परीक्षेत देशात तिसरा, तर महाराष्ट्रात पहिला, वाचा यशोगाथा…

जिल्ह्यातील आरफळ गावचे प्रथमेश पवार हे युपीएससी परीक्षेत देशात तिसरे, तर महाराष्ट्रात प्रथम आले आहेत.

साताऱ्याच्या पट्ठ्याची कमाल, UPSC परीक्षेत देशात तिसरा, तर महाराष्ट्रात पहिला, वाचा यशोगाथा...

सातारा : जिल्ह्यातील आरफळ गावचे प्रथमेश पवार हे युपीएससी परीक्षेत देशात तिसरे, तर महाराष्ट्रात प्रथम आले आहेत. त्यांच्या या यशासाठी प्रथमेश यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. आरफळ गावच्या प्रथमेश उमेश पवार-पाटील यांनी गावचे नाव देशाच्या पटलावर उज्ज्वल करून सन 2019 च्या झालेल्या युपीएससी परीक्षेत भारतात तिसरा आणि महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान मिळवलाय (Prathamesh Pawar from Satara UPSC exam success top in Maharashtra and third in India).

शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रथमेश यांनी खडतर प्रवासातून हे यश संपादन केले आहे. आरफळ गावात प्रथमेश यांच्या अभिनंदनाचे फलक लावण्यात आले आहेत. प्रथमेश यांचे शिक्षण निर्मल कॉन्व्हेंट, सातारा येथे पहिली ते दहावीपर्यंत झाले. यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज येथे एक्स्टर्नल अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेत त्यांनी दोन वर्ष पूर्णवेळ अभ्यास केला. पुढील शिक्षणासाठी पुण्यात जाऊन वाडिया कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी डिस्टींग्शनसह घेतली.

प्रथमेश यांनी सलग 2 वर्षे पुण्यातील युनिक अकॅडमीत पूर्णवेळ अभ्यास केला. अखेर त्यांच्या कष्टाला फळ मिळालं. त्यांनी युपीएससी परीक्षेत हे घवघवीत यश मिळवलं. युपीएससी परीक्षेत नुकत्याच लागलेल्या निकालात देशात तिसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्रात प्रथम आल्यामुळे प्रथमेश यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रथमेश यांच्या आई, वडिलांनी मुलाच्या या यशावर खूप समाधान व्यक्त केलंय.

हेही वाचा :

UPSC CAPF Assistant Commandant | यूपीएससीच्या सीएपीएफ असिस्टंट कमांडंट परीक्षेचा निकाल जाहीर

सुबोध जयस्वाल केंद्रात; आता पोलीस महासंचालकांची निवड नेमकी कशी?

MPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय, UPSC च्या धर्तीवर परीक्षेसाठी फक्त 6 संधी

व्हिडीओ पाहा :

Prathamesh Pawar from Satara UPSC exam success top in Maharashtra and third in India

Published On - 11:00 pm, Sun, 7 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI