
अहमदनगर : राज्यात सध्या फक्त बैलांचा भावच वाढला नाही तर गाढवांचा भावही (Donkey) तेवढाच वाढला आहे. आधी 50 हजाराला बैलजोडी (Bull) यायची मात्र आता तेवढ्या पैशात दोन बैल येणं शक्यच नाही. आता त्यांची किंमत लाखाच्या आसपास गेलीय. गाढवांच्या किंमतीही काही दिवसांपूर्वी कमी होत्या. आता त्याच गाढवाच्या जोडीची किंमत तब्बल अर्धा लाख म्हणजे 50 हजारांवर (Donkey rate) पोहोचलीय. नगरमधल्या पाथर्डी तालुक्यातल्या मढीतला गाढवांचा बाजार राज्यभर प्रसिद्ध आहे. या बाजारात यंदा गाढवांची आवक कमी आहे. आणि मागणी मात्र जास्त आहे. त्यामुळे गाढवांच्या किंमती आता बैलांच्या किमतीला मॅच करताना दिसून येत आहे. दोन गाढवांची जोडी या बाजारात तब्बल 50 हजाराला विकली गेलीय. तर याच बाजारात गावरान गाढवाची किंमत 30 हजारांवर गेलीय. काठेवाडी गाढवाची किंमत नेहमीच जास्त असते.
कोरोनामुळे बाजार बदलला
कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून बांधकाम क्षेत्राचे मार्केट पडले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गाढवांचं महत्वही कमी होत चालले आहे. राज्यात तीन ठिकाणी यात्रेनिमित्त गाढवांचा बाजार भरतो. त्यात जेजुरी, मढी आणि माळेगावचा समावेश आहे. यात मढीचा बाजार सर्वात मोठा आहे. यंदा बाजारात गुजराती काठेवाडी जातीची केवळ 120 गाढवं दिसून आले. त्यामुळे सहाजिकच त्याचा परिणाम भावावर झाला. आणि गाढवांचे भावही गगनाला भिडले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने राज्यात, देशात आणि जगात थैमान माजवलं आहे. त्यामुळे दोन वर्षेतरी बाजार भरलाच नाही. यंदा मात्र कसंही करून बाजार भरवला. त्यातही गाढवं कमी आली. त्यामुळे बाजार चांगलाच चढला.
बाजारात गाढवांची आवक कमी
बाजारात गाढवं आणण्याकरता लोकांनाा विनंती करण्याची वेळ मंडळावर आली. तरी गाढवं बाजारात येईना शेवटी नाईलाज म्हणून आले तेवढ्या गाढवांचा हा बाजार भरवण्यात आला. बाजारात ज्यादा गाढवं यावीत म्हणून चारा, पाणी फुकट देण्याची स्कीमही जाहीर केली. या बाजाराला तब्बल चार शतकांची मोठी परंपरा आहे. ही परंपरा मोडीत निघू नये यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहे. यात काठेवाडी गाढवांची मागणी जास्त असते मात्र यंदा त्याच गाढवांच्या आवकीवर परिणाम झालाय. त्यामुळे मंडळाचीही चिंता वाढलीय. बांधकामाला माती, वाळू, सिमेंट व्हायला गाढवासारखा स्वस्त आणि मस्त पर्याय नाही. त्यासाठी गाढवांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते.
Sugar Factory : पावसाळ्याच्या तोंडावरच बंद होणार साखर कारखाने, अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मिटेल का?
PM Kisan Yojna : अपात्र असूनही योजनेचा लाभ, आता Website च्या माध्यमातून करा परतावा..!
Turmeric Crop : अतिवृष्टीच्या नुकसानीच्या खुणा, पीक बहरात पण उत्पादन नाही पदरात