Sugar Factory : पावसाळ्याच्या तोंडावरच बंद होणार साखर कारखाने, अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मिटेल का?

यंदा साखरेचे उत्पादन विक्रमी झाले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे हे सर्व असताना याच राज्यामध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा तेवढाच ज्वलंत झाला आहे. त्यामुळे ऊस क्षेत्रात आणि उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी घेतली असली तरी अतिरिक्त ऊसाचे होत असलेले नुकसान हा चिंतेचा विषय आहे. कधी नव्हे ते मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आणि या विभागातीलच अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम राहिलेला आहे.आता यावर उपाय म्हणून साखर आयुक्त कार्यालयाकडून यंदा साखर कारखाने हे 31 मे पर्यंत सुरु राहणार असल्याचे सांगितले गेले आहे.

Sugar Factory : पावसाळ्याच्या तोंडावरच बंद होणार साखर कारखाने, अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मिटेल का?
पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याचे गाळप अंतिम टप्प्यात आहे. Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 3:08 PM

लातूर : यंदा साखरेचे उत्पादन विक्रमी झाले आहे. यामध्ये (State Government) महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे हे सर्व असताना याच राज्यामध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा तेवढाच ज्वलंत झाला आहे. त्यामुळे ऊस क्षेत्रात आणि उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी घेतली असली तरी  (Sugarcane Excess) अतिरिक्त ऊसाचे होत असलेले नुकसान हा चिंतेचा विषय आहे. कधी नव्हे ते मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आणि या विभागातीलच अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम राहिलेला आहे.आता यावर उपाय म्हणून (Sugar Commissioner) साखर आयुक्त कार्यालयाकडून यंदा साखर कारखाने हे 31 मे पर्यंत सुरु राहणार असल्याचे सांगितले गेले आहे. असे असातनाही या अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागतो की नाही याबाबत शंका आहे. शिवाय आता ऊस लागवड करुन 15 महिने उलटले आहे. त्यामुळे मे मध्ये तोड होऊन तरी काय उपयोग असा प्रश्न आहे.

कालावधी नाही तर गाळप प्रक्रिया वाढणे गरजेचे

गाळपाचा कालावधी वाढवून उपयोग नाही तर सध्याच्या काळात ऊस गाळपाची क्षमता वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्या भागातील गाळप पूर्ण झाले आहे त्या साखर कारखान्यांनी मराठवाड्यातील ऊसाची तोड करावी असा प्रस्ताव आ. राणाजगजितसिंह यांनी साखर आयुक्तांसमोर ठेवला आहे. शिवाय याला मंजूरी मिळाली तर काही प्रमाणात का होईना अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र, यावर कोणताही निर्णय झालेला नाही.यंदा मराठावाड्यातील साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे ऊस गाळप केले आहे. मात्र, क्षेत्रातच एवढी वाढ झाली की वेळेत तोड करणे शक्य झालेले नाही.

उत्पादन घटण्याचा धोका कायम

ऊस गाळपाची क्षमता वाढली किंवा मे पर्यंत जरी गाळप सुरुच राहिले तरी उत्पादनात घट आता अटळ झाली आहे. कारण लागवडीनंतर 12 महिन्यांमध्ये ऊसाची तोड होणे गरजेचे आहे. आता लागवड करुन 15 महिने उलटले आहे. वेळेत तोड न झाल्याने पुढील उत्पादनही घेत येत नाही. यातच ऊसाचे पाणी तोडून दोन महिने उलटले आहेत. ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक असले तरी यंदा सर्वात नुकसानीचे ठरत आहे.

प्रथमच 7 महिने गाळप हंगाम

यंदा ऑक्टोंबर 2021 मध्ये ऊस गाळपाला सुरवात झाली होती. सर्वकाही वेळेत होऊनही मध्यंतरीचा अवकाळीचा अडसर वगळता गाळप हंगाम कायम सुरु राहिलेला होता. सलग 7 महिने गाळप हंगाम सुरु राहूनही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागतो की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. यंदाच्या अतिरिक्त ऊसाचा परिणाम आगामी लागवडीवर होणार असेच वातावरण सध्या मराठवाड्यात पाहवयास मिळत आहे. अशीच परस्थिती राहिली तर ऊसाचे क्षेत्र घटणार हे नक्की.

संबंधित बातम्या :

PM Kisan Yojna : अपात्र असूनही योजनेचा लाभ, आता Website च्या माध्यमातून करा परतावा..!

Turmeric Crop : अतिवृष्टीच्या नुकसानीच्या खुणा, पीक बहरात पण उत्पादन नाही पदरात

Banana आता फळपिक, ‘मनरेगा’ मधूनही करता येणार लागवड, शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?

Non Stop LIVE Update
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.