NCP News: ..तर आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर विश्वास ठेवला पाहिजे, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
एकीकडे शरद पवार यांच्या निर्णयावरुन महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या भूमिकेबाबत मोठे विधान केले आहे.

दिनकर थोरात, प्रतिनिधी: शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केंद्र सरकारच्या डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी जोरदार टिका करत संताप व्यक्त केला आहे. एकीकडे शरद पवार यांच्या निर्णयावरुन महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या भूमिकेबाबत मोठे विधान केले आहे.
काय म्हणालेत पृथ्वीराज चव्हाण?
“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्पष्टपणे सांगत आहेत की अजूनही आमची चर्चा व्हायची आहे आणि आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही. एक गोष्ट निश्चित आहे की डिलिमिटेशनच्या बाजूने त्यांचे मतदान होईल अशी चिन्हे दिसत आहेत. शेवटी अंतिम निर्णय होईपर्यंत त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही. एक दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल. इंडिया आघाडीला त्यांनी त्यांचा निर्णय कळवला असेल, आज इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्ववादीकडून कोणी गेले नसले तरी त्याचा तसा अर्थ काढणे चुकीचे आहे,” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.
“शेवटी शरद पवार जो निर्णय घेतील तो निर्णय त्यांच्या पक्षाला मान्य असेल. पण ते अंतिम चर्चा झाली नाही असे म्हणत असतील
तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचे मतही जाणून घेतले पाहिजे. पण तसा काही निर्णय झाला तर प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघातील मतदारांना तोंड द्यावे लागेल. कारण भाजपच्या विरोधात मतदान घेतले आहे. ते आमच्यासोबत राहावेत अशी आमची इच्छा आहे,” असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
तसेच “10 जुलै 2026 रोजी मला राष्ट्रवादीच्या नवे भाजपच्या काही सूत्रांनी माहिती दिली होती. उद्धव ठाकरेंच्या पार्टीचा कार्यक्रम केला तसा शरद पवारांच्या पार्टीचा कार्यक्रम करणार आहे, असे मला सांगितले गेले. आता ती माझी माहिती होती ती माहिती खरी ठरू नये आणि ते आमच्या सोबत राहावे अशी माझी इच्छा आहे,” असंही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणालेत.