लोकसभा निवडणूक निकालासाठी मतमोजणी कशी होणार?

मुंबई :  देशभरात लोकसभा निकालाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. महाराष्ट्रातही 48 लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. निकालाला अगदी काही तास शिल्लक आहेत. अशावेळी निकालासाठीची मतमोजणी कशी होणार याविषयी देखील उत्सुरकता असल्याचे पाहायला मिळत आहे. मतमोजणीसाठीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. प्रशासनाचे काम सकाळी 7 वाजताच सुरु …

लोकसभा निवडणूक निकालासाठी मतमोजणी कशी होणार?

मुंबई :  देशभरात लोकसभा निकालाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. महाराष्ट्रातही 48 लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. निकालाला अगदी काही तास शिल्लक आहेत. अशावेळी निकालासाठीची मतमोजणी कशी होणार याविषयी देखील उत्सुरकता असल्याचे पाहायला मिळत आहे.

मतमोजणीसाठीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. प्रशासनाचे काम सकाळी 7 वाजताच सुरु होणार आहे. सकाळी 7 वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत EVM यंत्रे मतमोजणीसाठी स्ट्राँग रुममधून बाहेर काढली जाणार आहेत. मतमोजणीसाठी प्रत्येक मतदासंघासाठी किती टेबल असणार, त्यावर किती कर्मचारी असणार याचीही निश्चिती करण्यात आली आहे.

प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी राहणार आहेत. यामध्ये एक सुपरवायझर, एक सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या साधारण 18 ते 20 फेऱ्या होणार आहेत. एका फेरीसाठी साधारणपणे 30 मिनीटे लागतात. 1 फेरीची मतमोजणी झाल्यानंतर आणि त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची स्वाक्षरी झाल्यानंतरच दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

EVM मधील मतांची मोजणी आणि VVPAT च्या मतांची मोजणी होणार असल्यास  अशा स्थितीत प्रत्येक फेरीसाठी जवळपास 40 ते 45 मिनीटे लागतील. त्यामुळे निकाल घोषित होण्यास काहीसा विलंब होईल. एका विधानसभा मतदारसंघातील 5 VVPAT मशिनची मते आणि प्रत्यक्ष EVM ची मते यांची पडताळणी करण्याचे निर्देश असल्याने यासाठी काहीसा अधिक कालावधी लागणार आहे. त्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. VVPAT मते आणि प्रत्यक्ष EVM मते यात फरक आढळल्यास त्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे. त्यानंतर आयोग यावर अंतिम निर्णय घेईल.

मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 23 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. सर्वात अगोदर पोस्टल मतदानाची मोजणी होणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *