स्वतंत्र विदर्भासाठी डिसेंबर २०२७ पर्यंतचा अल्टिमेटम, ७ डिसेंबरला विधानमंडळावर हल्लाबोल

स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीने येत्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी हल्लाबोल मोर्चाचा इशारा दिला आहे.

स्वतंत्र विदर्भासाठी डिसेंबर २०२७ पर्यंतचा अल्टिमेटम, ७ डिसेंबरला विधानमंडळावर हल्लाबोल
separate vidarbha movement
| Updated on: Nov 20, 2026 | 11:48 PM

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच ७ डिसेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती विधानमंडळावर भव्य हल्लाबोल आंदोलन करणार आहे. यामध्ये विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांतील आणि तालुका स्तरावरील प्रतिनिधी आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत.या आंदोलनात स्वतंत्र विदर्भासाठी डिसेंबर २०२७ चा अल्टिमेटम देण्यात येणार आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांचे स्वतंत्र विदर्भाबाबत केवळ ठराव आणि आश्वासने दिली आहे, त्यांनी कधी याची अंमलबजावणी करण्याची दानत दाखवली नाही. त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा राहिल्या नाहीत असेही डॉ. गजबे यांनी म्हटले आहे.

माजी राज्यमंत्री आणि पूर्व विदर्भाचे अध्यक्ष डॉ. रमेशकुमार गजबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समितीचे नेते ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंधरा ते सोळा वर्षांपासून स्वतंत्र विदर्भासाठी लढा सुरू आहे. सरकारने डिसेंबर २०२७ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अन्यथा पुढील दिशा ठरवली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी स्वतंत्र विदर्भाबाबत दिलेल्या आश्वासनांचा आणि ठरावांचा दाखला देत, दोन्ही पक्ष अजूनही ते प्रत्यक्षात आणण्याच्या मनस्थितीत नसल्याचा दावाही  डॉ. रमेशकुमार गजबे,यांनी केला आहे.

Loading...

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us